नळदुर्ग शहराच्या सर्वागीण विकासासाठी प्रयत्नशील; आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते विविध कामांचे शुभारंभ 

नळदुर्ग, दि.११

नळदुर्ग शहराच्या  सर्वागीण विकासासाठी आपण प्रयत्नशील  असुन विकासाकरिता निधीची कमतरता पडणार नसल्याचे तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे  भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी नळदुर्ग शहरातील विविध विकास कामांचा शुभारंभ प्रसंगी बोलताना सांगितले.

  सोमवारी रोजी  आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या  हास्ते नळदुर्ग शहरांमध्ये अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजने अंतर्गत  विविध विकास कामांचे भूमिपूजन संपन्न झाले. सदर विकास कामांमध्ये प्रामुख्याने समावेश असलेली कामे पुढीलप्रमाणे आहेत.

 इंदिरानगर भागातील गटार व रस्त्याचे काम रू.३० लक्ष,
इंदिरानगर येथील मारुती मंदिराशेजारी नवीन सभागृह उभारणे रू.३० लक्ष, बौद्ध नगर येथे गार्डन आणि जॉगिंग पार्कसाठी रु.१ कोटी १९ लक्ष,बौद्ध नगरमध्ये नवीन सभागृह उभारण्यासाठी रू.५१ लाखांची तरतूद तर अंगणवाडीच्या इमारतीसाठी १० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

शहरातील गणेश मंडळांना भेट 

विविध गणेश मंडळांना भेटी देऊन श्री गणेशाची आरती केली.  शहरातील जय हिंद तरुण गणेश मंडळ व्यासनगर, शिवनेरी तरुण गणेश मंडळ, इंदिरानगर येथील गणेश मंडळ, दुर्गांनगर व वसंतनगर येथील गणेश मंडळांना भेट देऊन आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी गणेशाची आरती केली. 

प्रारंभी  शहरातील श्री शिवलिंगेश्वर हिरेमठास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी भेट देऊन  मठाधीपती श्री.ष.ब्र.बसवराज शिवाचार्य महास्वामीजी यांच्याशी  चर्चा केली. यावेळी महाराजांच्या हस्ते आमदार  पाटील यांचा सत्कार करण्यात आला. 

 भीमनगर येथील सभागृह तसेच अंगणवाडी बांधकामाच्या कामाचा शुभारंभ निवृत्त प्रा. शिवाजी बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले.  त्याचबरोबर इंदिरानगर येथे बांधण्यात येणाऱ्या सभागृहाच्या कामाचा शुभारंभ आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

   यावेळी बोलताना आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले की, येणाऱ्या काळात नळदुर्ग शहराचा आणखी मोठ्या प्रमाणात विकास करण्यात येणार आहे. विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नाही. शहरातील नागरिकांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असेही आमदार पाटील यांनी सांगितले.

  याप्रसंगी  भाजपचे सुशांत भूमकर, शहराध्यक्ष धिमाजी घुगे,माजी नगरसेवक नय्यर जागीरदार, स्वीय सहाय्यक नारायण नन्नवरे,  अबुलहसन रजवी, दत्तात्रय दासकर, माजी नगरसेवक दत्तात्रय कोरे, माजी नगरसेवक निरंजन राठोड, माजी नगरसेविका छमाबाई राठोड,  माजी शहराध्यक्ष पद्माकर घोडके, बबन चौधरी, कैलास चव्हाण, आनंद पवार, संजय विठ्ठल जाधव, रियाज शेख, अक्षय भोई,गौस शेख, यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते व गणेश मंडळांचे  कार्यकर्ते  उपस्थित होते.
 
Top