रमेश चव्हाण यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित
वागदरी,दि.१० : एस.के.गायकवाड
धरित्री विद्यालय अलियाबाद, नळदुर्ग ता.तुळजापूर येथील सहाशिक्षक रमेश भोजूसिंग चव्हाण यांना स्वाभिमानी शिक्षक कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य व मंत्रालय समन्वय समिती मुंबई तर्फे शिक्षक दिनानिमित्त राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सहशिक्षक रमेश चव्हाण यांनी शैक्षणिक व विविध सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सोलापूर जिल्हा शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष मनीष काळजे, माध्यमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सोलापूर सचिन जगताप, प्राथमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सोलापूर कादर शेख तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष बापूसाहेब अडसूळ यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानपूर्वक सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे ज्ञानदीप कलोपासक मंडळ. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाबुराव चव्हाण, उपाध्यक्ष भीमराव मोरे, कोषाध्यक्ष मल्लिनाथ माळगे,सचिव ॲड.सयाजी शिंदे, सहसचिव वसंतराव रामदासी,सदस्य किरण पाटील, सर्व सदस्य व मुख्याध्यापक पुजारी सुनील आदीसह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी शैक्षणिक,सामाजिक व कला क्षेत्रातील कला प्रेमींनीकडून अभिनंदन केले जात आहे.