भारतीय संविधान हे राष्ट्राच्या विकासाची कायदेशीर आचारसंहिता- प्रा. किरण सगर    

मुरूम, ता. उमरगा, दि.. १६  : 

भारतीय   संविधान हे राष्ट्राच्या प्रगतीच्या वाटचालीसाठीची काटेकोर कायदेशीर आचारसंहिता असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यकारिणी सदस्य प्रा. किरण सगर यांनी केले.


जागतिक लोकशाही दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या वतीने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग तसेच व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने भारतीय संविधान मंदिराचे आभासी पध्दतीने उद्घाटन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यांचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रातील ४३४ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ही प्रत्येक ठिकाणी संविधान मंदिराची प्रतिकृती शासनाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली होती.त्या प्रतिकृतीचे स्थानिक पातळीवर उद्घाटन करुन विद्यार्थ्यांना या उपक्रमाव्दारे संविधानाच्या संबंधाने सर्वतोपरी माहिती उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या संविधान मंदिरात भारतीय संविधान ग्रंथास अन्य पूरक माहितीपर तसेच वाचनीय पुस्तके ठेवण्यात आली होती.


यावेळी उमरगा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने स्थानिक पातळीवर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्था व्यवस्थापन समितीचे सदस्य पृथ्वीराज पाटील हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. किरण सगर उपाध्यक्ष मराठवाडा साहित्य परिषद संभाजीनगर हे होते. प्रमुख उपस्थितीत संस्था व्यवस्थापन समितीचे सदस्य राजेंद्र पाटील, पंडित जाधव, रवी पाटील, शुभम मुळजकर, प्राचार्य माळकुंजे एस. व्ही. आदी मान्यवर होते. पूढे बोलताना प्रा सगर म्हणाले की ; विविधतेतून एकता-एकात्मतेचा मार्ग अवलंबून अनेक वर्षे मानसिक, सामाजिक आर्थिक, गुलामगिरी सोसलेल्या गुलामांना मताधिकार देऊन त्यांना मतदार राजा बनविण्याचे महत्तम कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत भारतीय संविधानाने केले. भारतीय संविधान हा मानव मुक्तीचा लोककल्याणकारी सरनामाच आहे असे मत मांडले.


पृथ्वीराज पाटील व प्रा. किरण सगर यांच्या हस्ते संविधान मंदिराच्या प्रतिकृतीचे उद्घाटन करण्यात आले.आपल्या अध्यक्षीय समारोपात संविधानाची गरज का आहे, याची माहिती दिली. कार्यक्रमात संविधान प्रश्नमंजुषा व निबंध स्पर्धा तसेच संविधान विषयक रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह देऊन प्रथम, व्दितीय, तृतीय क्रमांक पटकाविलेल्या विद्यार्थींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

प्रास्ताविक गट निदेशक माकणे एन. आर. यांनी तर सूत्रसंचलन नाईकवाडे पी. एस. तर आभार  माशाळकर आर. व्ही. यांनी मानले. यावेळी कर्मचारी  गाडेकर एस. पी. देशपांडे, पी. जे., कडगंचे, बी. ए.,कोळी ए. डी.,सगर बी. डी.,काळे एन. के.,पतंगे एस. टी., शेंडगे एस. के., चिंचोळे एन. के., सगर एस. पी., पाचंगे ए. टी., धुमाळ एस. डी., माने आर. डी., जगताप ए. टी. आदी प्रतिष्ठीत नागरिक यांच्यासह विद्यार्थी  उपस्थित होते.
 
Top