तथागत गौतमबुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी कलश महायात्रेचे तुळजापूरात जंगी स्वागत 

वागदरी,दि.१६:एस.के.गायकवाड

सबंध विश्वाला शांतीचा, समानतेचा आणि अहिंसेचा संदेश देणारे तथागत‌ भगवान गौतमबुद्ध व भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या दि.१० सप्टेंबर २०२४ पासून पुणे येथुन निघालेल्या अस्थीकलश महायात्रेचे धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथे आगमन होताच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) सह विविध पक्ष,संस्था, संघटनेच्या कार्यकर्त्यांनी, बौद्ध समाज बांधवांनी जंगी स्वागत करून फुलांची उधळण करीत अस्थीकलशास अभिवादन केले.
  

इंडोएशियात मेता फाऊंडेशन भारत नागेश नगरी अस्थी कलश महायात्रा समिती धाराशिव व जंबोदीप बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी कलश महायात्रेचे तुळजापूर तालुक्यात आगमन होताच तामलवाडी,सुरत गाव, सांगवी,सिंदफळ,बोरी आदी ठिकाणी बौद्ध बांधवांनी या अस्थी कलश महायात्रेचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले.
  

तुळजापूर शहरातून बॅन्ड पथकासह छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक ते डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक मार्गे बसस्थानकाच्या मुख्य रस्त्यावरून फटाक्यांची आतिषबाजी करत भव्य मिरवणूक काढण्यात आली.
  
याप्रसंगी रिपाइं (आठवले) चे जिल्हा समन्वयक पॅंथर तानाजी कदम, अरुण कदम, प्रकाश कदम,अप्पा कदम, एस.के.गायकवाड, अमोल कदम, दयानंद कदम, शिवाजी गायकवाड, अतिश कदम,रवि वाघमारे, महादेव सोनवणे, तानाजी डावरे, गोपाळ सोनवणे सामाजिक कार्यकर्ते औदुंबर कदम,रामचंद्र ढवळे, बाबासाहेब वडवे,मारूती खारवे, विनोद जाधव,अरूण लोखंडे,अजय चंदनशिवे,पंडित भोसले,सह उपस्थित  बौद्ध बांधवांनी अस्थी कलशास पुष्प अर्पण करून अभिवादन केले.यावेळी आयोजक अस्थी कलश महायात्रा समितीचे  पदाधिकारी  विश्वस्त, पुज्यनीय भन्ते सह बौद्ध उपासक उपासिका, युवा कार्यकर्ते  उपस्थित होते.
 
Top