पर्यावरण संवर्धनासाठी कापडी पिशव्या तयार करणे गरजेचे आहे - मारुती बनसोडे.            

नळदुर्ग,दि.१४

  सध्या हवामान बदलामुळे मानवी मनावर व शेतीवर ही अनिष्ट परिणाम होत आहेत. बदलत्या हवामाानुसार आपण ही आता शेती व अन्य व्यवसाय करणे गरजेचे आहे. प्लास्टिक चा अति वापर हा सुद्धा घातक आहे त्यामुळे प्लॅस्टिक पिशव्याला पर्याय म्हणून कपडी पिशव्यांचा वापर करणे गरजेचे आहे. त्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा असे मत परिवर्तन सामाजिक संस्थेचे सचिव मारुती बनसोडे यांनी व्यक्त केले आहे. 

शनिवार दि.14 रोजी जळकोट ता. तुळजापूर येथे महिलांची बैठक घेण्यात आली. त्यावेळी मारुती बनसोडे हे बोलत होते.ते पुढे म्हणाले की,छोट्या, छोट्या उद्योग व्यवसायातून आपली उपजीविका भागवता येते. त्यासाठी कष्ट करण्याची तयारी ठेवावे, आपणास आवश्यक ते प्रशिक्षण व निधी उपलब्ध करुन देण्यासाठी परिवर्तन संस्था आपल्या सोबत आहे असे त्यांनी सांगितले. यावेळी 50 महिला उपस्थित होत्या
 
Top