ग्रामीण भागांतील विकास कामांना प्राधान्य देवून एकाधिकार शाहीला आळा घालण्यासाठीच निवडणूकीच्या रिंगणात उतरलो आहे : मधुकरराव चव्हाण 

वागदरी (एस.के.गायकवाड

तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील एकाधिकार शाहीला वेळीच आळा घालण्यासाठी आणि ग्रामीण भागातील विकास कामांना प्राधान्य देवून आगामी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे.तेंव्हा जनतेनी सहकार्य करून महाविकास आघाडीला प्रचंड मतांनी विजयी करून लोकशाही जिवंत ठेवावी असे प्रतिपादन माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी शहापूर ता.तुळजपूर येथे बोलताना केले.
 

आगामी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या प्रचारार्थ  शहापूर येथे जनसंवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता.या प्रसंगी ते बोलत होते.

या जनसंवाद ‌मेळाव्यास मौजे शहापूर येथे प्रचंड प्रतिसाद मिळाला असून उपस्थित ग्रामस्थांनी मधुकरराव चव्हाण यांचे उस्फुर्तपणे स्वागत केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कार्यकर्ते भास्कर सुरवसे  तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी  जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण, दिलीप सोमवंशी हे  उपस्थित होते. 
  
याप्रसंगी नरसिंग पवार,मनोहर मोरे, विजय  पवार, शाहूराज जाधव,जितेंद्र पाटील,पांडुरंग सुरवसे, बाबा जाधव,नितीन जाधव यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top