पोतराज महासंघ महाराष्ट्र राज्य तुळजापूर तालुका अध्यक्षपदी आप्पासाहेब  साखरे यांची निवड

तुळजापूर,दि.२४:

पोतराज महासंघ महाराष्ट्र राज्य संघटनेची तालुका स्तरीय निवड करण्यासाठी महासंघाचे कार्याध्यक्ष लखन  ननवरे यांच्या अध्यक्षतेखाली माळशिरस येथे बैठक पार पडली .
 
यावेळी पोतराजाचे समजाविषयी असणारी भावना वा त्यांच्या प्रदीर्घ कार्याची दाखल घेऊन पुढील कार्यकारिणी जाहीर केली.तुळजापूर तालुका अध्यक्ष  आप्पासाहेब नामदेव साखरे,  उपाध्यक्ष मारुती कृष्णात भोवळ, कार्यध्यक्ष  सचिन पोपट माने, तर लोहारा तालुका अध्यक्ष  दुर्गा तुकाराम माने, उपाध्यक्ष लहू लिंबराज कांबळे,उमरगा तालुका अध्यक्ष कृष्णात शिवाजी भोवळ, उपाध्यक्ष लक्ष्मण दाजी गायकवाड, कार्याध्यक्ष अनिल अर्जुन जाधव आदींची निवड करुन लखन ननवरे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.

 या कार्यक्रमाच्या वेळी धाराशिव जिल्हा अध्यक्ष  नागनाथ शिवराम शिंदे तर  जिल्हा उपाध्यक्ष  धनराज लक्ष्मण सरवदे आदी  उपस्थित होते.
 
Top