एस.टी.बसवरील चालकाचा ताबा सुटून झालेल्या अपघातात वाहक चालकसह ३० प्रवासी जखमी; बहुतांश जखमी तुळजापूर तालुक्यातील
नळदुर्ग,दि.२३ : नवल नाईक
तुळजापूरहून गंधोरा, किलज मार्गे नंदगावकडे जाणाऱ्या एसटी बसचे राष्ट्रीय महामार्गावरील मुर्टा पाटी येथे एका वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात ३० प्रवासी जख्मी झाले. हा आपघात सोमवार दि.२३ सप्टेंबर रोजी सकाळी सव्वा दहा वाजता झाला.
नळदुर्ग येथील उपजिल्हा रूग्णालयात या रूग्णांना दाखल करण्यात आले असून सात रूग्णांना सोलापूर येथील शासकीय रूग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. येथून जाणाऱ्या नळदुर्ग ते चिकुंद्रा या बसचे वाहक गुंडप्पा डुकरे व चालक रवी शिंदे यांनी अपघातग्रस्त बसमधील प्रवाशांना तात्काळ आपल्याकडील बसमध्ये बसवून नळदुर्ग उपजिल्हा रूग्णालयात दाखल केल्यामुळे जखमी रूग्णांना वेळेत उपचार मिळाले.
बहुतांशी रुग्णांच्या डोक्याला, हाताला, पायाला मार लागला असून यापैकी सात जणांना सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. बसमध्ये एकूण ४५ प्रवासी होते. उर्वरित रुग्णांना नळदुर्ग येथे प्रथमोपचार करण्यात आले आहेत. नळदुर्ग उपजिल्हा रुग्णालयाचे अधिष्ठाता इस्माईल मुल्ला, डॉ. सुरेंद्र मडके, डॉ. राहुल जडगे, डॉ, मंजिरी शिंगारे यांच्यासह दहा कर्मचाऱ्यांनी जखमी रुग्णावर उपचार केले.
तुळजापूर नंदगाव ही बस क्र. एमएच २० बीएल ४२३५ नंदगावच्या दिशेने जात असताना सकाळी १०.१५ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. तुळजापूर विभागाचे आगार प्रमुख रामचंद्र शिंदे, कर्मचारी राजवीर साळुंखे, नळदुर्ग वाहतूक नियंत्रक महेश डुकरे यांनी या ठिकाणी भेट दिली.
अपघातातील जखमींची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
रमेश मलकू राजमाने (वय ६०) रा. होर्टी, उर्मिला प्रवीण तांबे ( वय २७) चिकुंद्रा, राऊबाई मोहन गायकवाड (वय ६०) चिकुंद्रा, सुनीता दत्तात्रय भोसले (वय ५२) होर्टी, अश्विनी भैरू लोखंडे (वय १५) मेसाई जवळगा, सुजाता भगवान कुनाळे (वय २२) ऐकूरगा, सुमन लाला जाधव (वय ४७) गंधोरा, श्रीहरी भागवत कुन्हाळे (वय पाच) ऐकूरगा, सुमन बब्रू थोरात (वय ६५ ) मुर्टा , दयानंद विश्वनाथ खोत (वय ७८ ) होर्टी, लक्ष्मी विठ्ठल सगट ( वय ४०) होर्टी, समीक्षा विठ्ठल सगट (वय १४) होर्टी, सुनंदा गोविंद पांचाळ (वय ५५) होर्टी, अश्विनी रमेश कदम (वय १७ ) मुर्टा, शिवाजी किसन कदम ( वय ४४) मुर्टा, सुशिलाबाई गणपत कवठे (वय ७५) मुर्टा, वनिता शिवाजी कदम मुर्टा, मोहन हरिदास गायकवाड (वय ६५) चिकुंद्रा, साधू निवृत्ती अंगुले (वय ८४) मुर्टा , मीना धनराज कदम (वय ४०) मुर्टा, सुमनबाई भानुदास कदम ( वय ७०) मुर्टा , मनीषा भैरू लोखंडे ( वय ३५) मेसाई जवळगा, उत्तम तुकाराम मस्के ( वय५० ) कीलज, देविदास यादव चुंगे ( वय ७५) मुर्टा, पांडुरंग नामदेव लोंढे (वय ६५) मुर्टा. प्रियंका वामन कदम (वय १८ ) मुर्टा, शिवशंकर तायप्पा कांबळे ( वाहक वय ४४) जळकोट, मंगल प्रभाकर कालेकर (वय ६०) वडगाव देव, प्रभाकर बाबुराव कालेकर ( वय ८१) वडगाव देव.व बस चालक बरकत शेख (वय ४३ ) गंधोरा आदी.
दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच विधानसभा निवडणुकीतील इच्छुक उमेदवार अण्णासाहेब दराडे यांनी उपजिल्हा रुग्णालयात जाऊन जखमी प्रवाशांची विचारपूस केली. जखमीना रुग्णालयात केस पेपर म्हणून गतवर्षी नवरात्रामध्ये मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्री यांचें छायाचित्रे छापलेल्या महाआरोग्य शिबिर पत्रकाचा कर्मचारी वापर करताना आढळून आले. आरोग्य विभागाच्या कारभाराबद्दल दराडे यांनी यावेळी संताप व्यक्त केला.