राजकीय वारसा नाही, कोणी गॉडफादर नाही, इच्छुकांच्या भाऊगर्दीत इच्छुक अपक्ष उमेदवार अण्णासाहेब दराडे यांची तुळजापूर मतदार संघात वाढती क्रेझ 

तुळजापूर,दि.२२: नवल नाईक 


राजकीय वारसा नाही, किंवा कोणी गॉडफादर नाही, तरीही इच्छुकांच्या भाऊगर्दीत इच्छुक अपक्ष उमेदवार अण्णासाहेब दराडे यांनी दमदारपणे तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावाला भेट देवुन मतदाराशी हितगुज करीत आहेत. महिन्याभरापूर्वी घर सोडले असुन दिवसभर लोकांशी संवाद साधुन रात्री शेतातील शेतकऱ्याच्या कोट्यावर मुक्कामी राहत असल्याचे अण्णासाहेब दराडे यांनी "तुळजापूर लाईव्हशी " बोलताना सांगितले.

तुळजापूर विधानसभा मतदार संघातील इच्छुक अपक्ष उमेदवार आण्णासाहेब दराडे यांनी सध्या या मतदार संघातील संभाव्य  बलाढ्य व धनाढ्य उमेदवारांची झोप उडवली आहे. आपल्या प्रचार दौऱ्यावर चित्ररथ घेऊन फिरणाऱ्या आण्णासाहेब दराडे यांना या मतदार संघातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातल्याचे दिसत असुन  राजकीय वर्तुळात त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले आहे.

 आण्णासाहेब दराडे हे हगलूर ता. तुळजापूर येथील रहिवासी आहेत. त्यांनी तुळजापूर विधानसभा मतदार संघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे कार्यकारीणी सदस्य अशोक जगदाळे यांच्यानंतर प्रचारामध्ये आण्णासाहेब दराडे यांनी मुसंडी मारली आहे. १०,१२ गाड्याचा लवाजमा तसेच त्यांनी तयार केलेला चित्ररथ घेऊन ते वाडी, वस्ती, तांड्यावर जात आहेत. वाडी, वस्ती, तांड्यातील मतदारांशी संवाद साधताना दराडे यांनी अतिशय भावनिक होऊन परिवर्तन हवंय ना, मग बघत बसू नका, परिवर्तनाच्या लढ्यात सहभागी व्हा असे आवाहन ते मतदारांना करीत आहेत. 


चित्ररथाच्या माध्यमातून त्यांनी आपला निवडणुकीत जाहीरनामा काय आहे हे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. अतिशय शिस्तबद्ध प्रचार तसेच भावनिक व लोकांच्या काळजाला भिडणारे भाषण करून आण्णासाहेब दराडे यांनी जनमत मिळवण्याचा प्रयत्न सुरू  केला असून यामध्ये त्यांना सध्या तरी बऱ्यापैकी यश प्राप्त झाले आहे. दररोज सकाळी सात वाजल्यापासून आण्णासाहेब दराडे हे प्रचारासाठी बाहेर पडत आहेत. ते रात्री उशिरापर्यंत प्रचार करीत आहेत. कुठलीच राजकीय पार्श्वभूमी नसताना तसेच अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतलेल्या  आण्णासाहेब दराडे यांना तुळजापूर विधानसभा मतदान संघात सध्या जो प्रतिसाद मिळत आहे तो वाखानन्याजोगा आहे. दराडे यांना प्रत्येक गावात जो प्रतिसाद मिळत आहे ते पाहता तुळजापूर विधानसभा मतदार संघातील मतदार सर्वच राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांना कंटाळले असल्याचे दिसून येत आहे. दराडे यांनी टॅंकरमधून उजनीचे पाणी आणले आहे. हे टॅंकर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. उजनीचे पाणी तालुक्यात येणार म्हणून सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आपला गळा फाटेपर्यंत अनेकदा ओरडून सांगितले मात्र एकाही  महाभागाने अद्याप उजनीचे पाणी तुळजापूर तालुक्यात आणले नाही. मात्र टँकरच्या माध्यमातून का होईना दराडे यांनी  उजनीचे पाणी  तालुक्यात आणले. त्याचबरोबर निवडणूकीतील आपला जाहीरनामा त्यांनी १०० रुपयाच्या स्टॅम्पवर लिहून दिला असून हेही मतदारांच्या आकर्षनाचे केंद्रबिंदू झाले आहे. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत आण्णासाहेब दराडे यांची वाट पाहत नागरिक गावात बसत आहेत एक आश्चर्यच म्हणावे लागेल निवडणूकीच्या तोंडावर देखावा करणाऱ्यांना, निवडून आल्यानंतर पाच वर्षे गायब होणाऱ्याना, फक्त सोशल मीडियावरचा विकास सांगणाऱ्याना आता कायमच घरी पाठवण्याची वेळ आली आहे असे दराडे हे मतदारांना सांगत आहेत.


  दराडे यांना दिवसेंदिवस मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत तुळजापूर विधानसभा मतदारसंघात काय चमत्कार होणार का? हे पाहणे गरजेचे आहे. मात्र दराडे यांनी सध्यातरी तुळजापूर विधानसभा मतदार संघात अनेकांची झोप उडविली आहे.
 
Top