मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण
मुरुम,दि.१७
मुरूम जिल्हा परिषद स्पेशल शाळा भीमनगर मुरूम येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त शाळेच्या मुख्याध्यापिका प्रमिला तूपेरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले,
याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले,यावेळी उपाध्यक्ष शिवराज कांबळे,आंबेडकर शहर वाचनालयचे अध्यक्ष रुपचंद गायकवाड, माजी नगरसेवक चंद्रकांत गोडबोले,
प्रा:अण्णाराव कांबळे,प्रा महेश मोटे,राम कांबळे,महेंद्र कांबळे,अरविंद कांबळे,आनंद कांबळे,आदिनाथ बनसोडे,मनीषा भालेराव,श्वेता गायकवाड,रेश्मा कांबळे आदी उपस्थित होते. मराठवाडा मुक्ती संग्रामदिनाचे औचित्य साधून शाळेच्या वतीने प्रा अण्णाराव कांबळे सर यांचा सत्कार व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निर्मलकुमार लिमये यांच्या हस्ते करण्यात आला.तर प्रा:नागनाथ बनसोडे सर यांचा सत्कार उपाध्यक्ष शिवराज कांबळे यांनी केले.
स्मृतीशेष गौराबई प्रल्हाद बनसोडे यांच्या प्रथमस्मृती निमित्त प्रा नागनाथ बनसोडे परिवाराच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊ व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपचंद ख्याडे सर तर आभार शिवाजी गायकवाड सर यांनी मानले,तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपक्रमशील शिक्षिका रेणुका कुलकर्णी,सुनीता मिरगाळे,मंगल कचले,अमर कांबळे यांनी परिश्रम घेतले.