परिवर्तन राज्यस्तरीय पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवावे - मारुती बनसोडे

नळदुर्ग,दि.१७

परिवर्तन सामाजिक संस्था नळदुर्ग ही संस्था गेली २८ वर्षे धाराशिव जिल्हयात ग्रामीण व शहरी भागात कार्यरत आहे.संस्थेकडून  प्रतिवर्षा प्रमाणे याहीवर्षी कला, क्रीडा, साहित्य, समाजसेवा,पर्यावरण , महिला सक्षमीकरण, जलसुरक्षा, शैक्षणिक, आरोग्य,व्यसनमुक्ती,
सांस्कृतिक,  युवा,पत्रकारिता, संस्था, कंपनी ,कर्तव्यदक्ष सरपंच, इत्यादी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना परिवर्तन राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तरी इच्छुक व्यक्तींनी संस्थाने आपला प्रस्ताव तयार करून सचिव ,परिवर्तन सामाजिक संस्था,व्यंकटेश नगर, नळदुर्ग ता.तुळजापूर जि.धाराशिव ४१३६०२ या पत्त्यावर दिनांक ३०/९/२०२४ पर्यंत पाठवावा असे आवाहन संस्थेचे सचिव मारुती बनसोडे यांनी केले आहे.
 
Top