मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन
पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांनी स्मृतीस्तंभास केले अभिवादन
धाराशिव दि.१७
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त आज १७ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मराठवाडा मुक्तीसंग्रामानिमित्त उभारलेल्या स्मृतिस्तंभास पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजीराव सावंत यांनी मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमापूर्वी पुष्पचक्र वाहून अभिवादन केले.
यावेळी स्वातंत्र्य सैनिक भास्करराव नायगावकर,बुबासाहेब जाधव, प्रकाशराव तोडकरी,गोविंद नलवडे शेषराव बनसोडे, बाळासाहेब टापरे,खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर,आमदार सर्वश्री कैलास पाटील,राणाजगजीतसिंह पाटील,ज्ञानराज चौगुले,जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,पोलीस अधीक्षक संजय जाधव,अप्पर पोलीस अधीक्षक गौहर हसन,निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव,व स्वातंत्र्यसैनिकांचे वारस यावेळी उपस्थित होते.उपस्थितांनी देखील स्मृतीस्तंभास पुष्पचक्र वाहिली.
स्मृतीस्तंभाच्या अभिवादन कार्यक्रमाच्या वेळी पोलिसांनी अभिवादन करून बंदुकीच्या हवेत तीन फैरी झाडून स्मृतीस्तंभास मानवंदना दिली. यावेळी विविध राजकीय पक्षांचे प्रमुख पदाधिकारी,विविध कार्यालयाचे विभाग प्रमुख,विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक, ज्येष्ठ नागरिक,पत्रकार बांधव,महिला व विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.