लालबहादूर विद्यालयाची कु. मंजिरी घोडके जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविल्याने विभागीय स्पर्धेसाठी निवड
नळदुर्ग,दि.२१ : नवल नाईक
धाराशिव येथे शुक्रवार दि. 20 सप्टेंबर रोजी जिल्हा क्रीडांगणावर झालेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत
होर्टी ता. तुळजापूर येथील लालबहादूर शास्त्री विद्यालयाची कु. मंजिरी दत्ता घोडके 42 किलो वजन गटात जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकाविला आहे . त्याची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली असून याच शाळेतील दोन विद्यार्थी व दोन विद्यार्थीनींनी कुस्ती स्पर्धेत व्दितीय क्रमांक मिळविला आहे . विजेत्या सर्व विद्यार्थ्यांचे विद्यालयात ग्रामस्थातर्फे गौरव करुन शुभेच्छा देण्यात आले.
पार पडलेल्या कुस्ती स्पर्धेत तुळजापूर तालुक्यातील होर्टीच्या लालबहादूर शास्त्री विद्यालयाची कु. मंजिरी घोडके 42 किलो वजन गटातुन प्रथम तर 39किलो वजन गटातुन कार्तिकी दत्ता भोसले जिल्ह्यात द्वितीय तर 54किलो वजन गटात राधा सहदेव बोरगावे द्वितीय आणि प्रतिक भोसले व संग्राम कांबळे 48किलो वजन गटात जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकाविला.
जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत लाल बहादूर शास्त्री विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनीनी घवघवीत यश संपादन केल्याबद्दल होर्टी ग्रामस्थांकडून सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक उपाशे , निवृत्त प्रा.व्यास कुलकर्णी , सोसायटीचे माजी चेअरमन दत्ता राजमाने, शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष दत्ता भोसले, सोसायटीचे संचालक संतोष मोरे, व्यंकट महाबोले, नवगिरे , गिरी , सोमनाथ गुंजिटे, साईनाथ घोडके, अशोक राजमाने ,दत्ता घोडके आदीसह शिक्षक ,प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.