माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांची वागदरी गावाला भेट : आगामी विधानसभा निवडणुक संदर्भात ग्रामस्थांशी साधला संवाद
वागदरी,दि.२१: एस.के.गायकवाड
तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून पाच वेळा विजय हस्तगत करुन महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून तर धाराशिव (उस्मानाबाद) जिल्हा पालकमंत्री म्हणून प्रतिनिधित्व करणारे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी वागदरी गावाला भेट देऊन आगामी होऊ विधानसभा निवडणुक संदर्भात ग्रामस्थांसी संवाद साधला असून पुन्हा एकदा आपण तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून महाविकस आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रीय काॅंग्रेस पक्षाकडून निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले.
मधुकरराव चव्हाण हे राष्ट्रीय काॅंग्रेस पक्षाचे महाराष्ट्रातील जेष्ठ बुजुर्ग नेते आहेत.त्यानी आता पर्यंतच्या राजकीय कारकीर्द तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून पाच टर्म विजय हस्तगत करुन महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री, मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष, विधानसभा उपाध्यक्ष आणि धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री आसा पदभार सांभाळलत तुळजापूर विधानसभा मतदारसंघात अनेक साठवण तलावासह विविध विकासात्मक कामे केलेली आहेत.उजनी धरणाचे अतिरिक्त पाणी मराठवाड्याला विशेषता: धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर आणि धाराशिवला मिळाले पाहिजे, यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा करून मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला आहे.
वागदरी येथील ग्रामस्थांसी संवाद साधताना त्यांनी आपल्या आतापर्यंत केलेल्या विकास कामांना उजाळा दिला असून होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपण निवडणूक लढविणार असून मतदार बंधू भगिनींने सहकार्य करावे असे विनंती वजा त्यांनी आवाहन केले.
याप्रसंगी जि.प.सदस्य प्रकाश चव्हाण, दिलीप सोमवंशी , माजी सरपंच ज्ञानेश्वर पाटील,ह.भ.प.राजकुमार पाटील , दत्ता सुरवसे, जेष्ठ कार्यकर्ते शिवाजी मिटकर गुरुजी,ग्रा.प.सदस्य अमोल पवार आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.