नळदुर्ग शहरात गणेशोत्सव मिरवणूक शांततेत व उत्साहात; भाजपच्या वतीने पोलिस निरीक्षक सरोदे यांचा सत्कार
नळदुर्ग,दि.२०:
सर्व गणेश मंडळांच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या सहकार्याने अत्यंत शांततेत व उत्साहात गणरायाचे नळदुर्ग शहरात विसर्जन झाले.त्याचबरोबर मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त जुलूस शांततेत व उत्साहाने पार पडल्याबद्दल पोलिस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांचे भारतीय जनता पक्षाच्या वतीने सत्कार करुन पोलिस कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले.
गणेशोत्सवात नळदुर्ग शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ६ पोलिस अधिकारी, ३० कर्मचारी, ५० होमगार्ड, व एस आर पी तुकडी तैनात करण्यात आली होती. धाराशिवचे अपर पोलिस अधीक्षक गौहर हसन, तुळजापूर उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ निलेश देशमुख यांनी मिरवणुकी दरम्यान नळदुर्गला भेट दिली.
पोलिस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज देवकर, पोलिस उपनिरीक्षक ईश्वर नांगरे यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.
नळदुर्ग पोलिस ठाणे येथे पोलिस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांचा सत्कार नळदुर्ग शहर भाजपच्या वतीने शहराध्यक्ष धिमाजी घुगे यांनी बुके देवुन केला.यावेळी
भाजयुमोचे जिल्हा चिटणीस श्रमिक पोतदार, भाजपचे माजी शहराध्यक्ष पद्माकर घोडके, अक्षय भोई, भाजयुमोचे शहराध्यक्ष गणेश मोरेडे, विशाल डुकरे, सागर हजारे, यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.