वात्सल्य  संस्थेच्या मदतीने स्वच्छता लोहारवाडीत मोहिम संपन्न

अणदूरःदि.०१

केंद्र शासनाच्या युवक कल्याण उपक्रमांतर्गत दि.18 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरच्या दरम्यान योग शिबिर,स्वच्छता मोहीम, आरोग्य तपासणी अशा कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.जिल्हा क्रीडा अधिकारी धाराशिव यांच्या मार्गदर्शनात होणाऱ्या या विविध उपक्रमात जिल्ह्यातील सामाजिक संस्था महत्त्वाची जबाबदारी उचलत आहेत.

आपला देश हा युवकांचा देश म्हणून ओळखला जातो. राष्ट्रनिर्माणाच्या शाश्वत विकासाच्या मुख्य प्रवाहात युवांचे मोठे योगदान आहे,सामाजिक विकासाच्या माध्यमांची ओळख करून राष्ट्रीय व सामाजिक विकासाच्या प्रवाहात युवाशक्तीचा सहभाग असून तो वाढविणे आवश्यक आहे हा यामागचा उद्देश आहे.

त्याअंतर्गत मौजे लोहारवाडी येथे वात्सल्य  सामाजिक संस्थेच्या मदतीने स्वच्छता मोहीम संपन्न झाली.यावेळी गावातील सर्व स्तरातील व्यक्तींनी मंदिर,सार्वजनिक ठिकाणे,शाळा इत्यादी ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवून पूर्ण परिसर चकाचक केला व कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली.फक्त एक दिवस उपक्रम न करता सातत्याने ही मोहीम राबवून घर,गाव,परिसर स्वच्छ ठेवण्याचा निर्धार यावेळी युवकांनी केला.
या उपक्रमात लक्ष्मण लोहार, विठ्ठल लोहार,सोमनाथ लोहार, राहुल लोहार,परमेश्वर लोहार,छाया लोहार, अनुसया लोहार,सुशिलाबाई लोहार तसेच वात्सल्य सामाजिक संस्थेचे पदाधिकारी,कार्यकर्ते व ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग नोंदवला
 
Top