नळदुर्ग दि.१६ : नवल नाईक
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रयत्नामुळे नळदुर्ग येथे महिन्याभरापूर्वी मंजूर झालेल्या अप्पर तहसील कार्यालयाचे तहसिलदार म्हणुन धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसिलदार अभिजीत जगताप यांच्याकडे अतिरिक्त पदभार देण्यात आले असल्याचे आदेश धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयाने काढले आहे..
जा.क्र.२०२४/ महसुल/ अस्था-०४/तह/एसआय-१३ दि.१४/ १०/२०२४ रोजी आदेशान्वये तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथे अपर तहसिल कार्यालय स्थापन करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानुसार सदर कार्यालयातील तहसिलदार संवर्गातील अधिकारी यांचे ०१ पद मंजुर करण्यात आलेले आहे. त्यानुषांगाने "अपर तहसिल कार्यालय नळदुर्ग" या पदाचा अतिरिक्त् पदभार अभिजीत जगताप तहसिलदार (महसुल) जि.का.धाराशिव यांच्याकडे सोपवण्यात आल्याचे आदेश दि.१४ ऑक्टोंबर रोजी निर्गमित केले आहे.
अभिजित जगताप (महसुल) जिल्हा कार्यालय धाराशिव यांनी संदर्भीय शासन निर्णनयानुसार आवश्यक कार्यवाही करावी व पुढील आदेश होईपर्यंत मुळपदासह अतिरिक्त् पदाचे कामकाज करावे संबंधीत अधिकारी यांनी सदर आदेशाची अमलबजावणी करण्याचे धाराशिव निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांनी आदेश दिले आहेत.
नळदुर्ग अपर तहसिल कार्यालयांतर्गत या महसुल मंडळातील गावाचा समावेश
नळदुर्ग महसूल मंडळातील येडोळा ,आलियाबाद, रामतीर्थ, अणदुर ,चिवरी, उमरगा चिवरी, होर्टी, मुर्टा-मानमोडी, खुदावाडी, सराटी ,वागदरी तर जळकोट महसूल मंडळातील जळकोटवाडी नळ, हंगरगा नळ, इंदिरानगर, बोरगाव, नंदगाव ,लोहगाव, सिंदगाव, कुन्सावळी, सलगरा बोळेगाव ,शहापूर, गुजनूर ,दहिटणा ,गुळहळ्ळी यासह वाडी वस्ती, तांडे असे मिळुन नळदुर्ग अपर तहसील कार्यक्षेत्रात नळदुर्ग व जळकोट महसूल मंडळातील ३६ गावांचा समावेश आहे.
नळदुर्ग येथे शासनाने मंजूर झालेल्या अपर तहसील कार्यालयाचे आमदार राणाजगजजितसिंह पाटील यांच्या हस्ते प्रतिनिधीक स्वरूपात विजयादशमीच्या मुहूर्तावर उद्घाटन करण्यात आले, शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मुख्य ऐतिहासिक चावडी चौकात नगरपालिकेच्या सभागृहात हे अपर तहसील कार्यालय सुरू करण्यात येत आहे. तहसीलदार व लिपिक ही दोन पदे येथे मंजूर असून याच ठिकाणी तलाठी कार्यालयही मागील काही महिन्यापूर्वी सुरू करण्यात आले आहे. यामुळे जुन्या बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना याचा व्यवसाय वृद्धीच्या दृष्टीने दिलासा मिळाला आहे.
या अपर तहसील कार्यालयाचा शासन निर्णय घेण्यात आला असून महसूल व वन विभागाकडून बुधवार दि.९ आॕक्टोबर रोजी शासन निर्णय झाला. अपर तहसील कार्यालयास उच्चस्तरीय समितीची मंजूरी मिळाल्याची माहिती दि. १२ सप्टेंबर रोजी मिळाली. महिनाभरात याबाबत शासन निर्णयही झाला. लागलीच आता तहसिलदार पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आल्याचे आदेश निर्गमित झाले.त्यामुळे नळदुर्ग येथे लवकरच तहसिलचे कामकाज सुरु होणार असल्याने
शहर व परिसरातील व्यापारी ,नागरिकांनी आनंद व्यक्त केला.
गणेश मोरडे, व्यापारी, नळदुर्ग
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रयत्नामुळे तहसील कार्यालय कार्यान्वित होत असल्याने शहरातील व्यापारीच्या वतीने गणेश मोरडे यांनी आभार मानले. नागरिकांना तहसिलच्या कामासाठी तुळजापूरला जाण्याची गरज भासणार नाही.नळदुर्ग परिसरातील अनेक गावातील नागरिकांचा वेळ व पैसा वाचणार आहे.शहरातील विविध व्यवसायाची उलाढाल वाढणार असुन व्यवसायिक व नागरिकांतून आनंद व्यक्त केले जात आहे.