शिवाजी महाविद्यालयाची शुभांगी सीतापुरे एम ए इतिहास मध्ये विद्यापीठात प्रथम.

मुरुम,दि.१६:

 डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगरच्या मार्च एप्रिल 2024 मध्ये झालेल्या परीक्षेमध्ये पदव्युत्तर परीक्षेत एम ए इतिहास या विषयात संपूर्ण विद्यापीठात प्रथम येण्याचा मान श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा येथे एम ए इतिहास द्वितीय वर्षात शिकत असलेल्या शुभांगी सीतापुरे हिने पटकावला आहे.
 
विद्यापीठ परीक्षेत एम. ए. इतिहास विषयात सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना सौ. करुणा ज्ञानेश्वर चापोलीकर मेमोरियल हे रुपये दोन हजार आणि प्रमाणपत्र असे पारितोषिक दिले जाते. वरील  पारितोषिक
कु. शुभांगी सीतापुरे यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय अस्वले यांच्या हस्ते देण्यात आले. 

यावेळी उपप्राचार्य डॉ. विलास इंगळे, इतिहास विभागाचे विभाग प्रमुख डॉ.गिरीधर सोमवंशी, डॉ. बी जी माने, प्रा. संग्राम जाधव, प्रा. पंढरीनाथ बनसोडे इत्यादी उपस्थित होते. या यशाबद्दल भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल शिवाजीराव मोरे, उपाध्यक्ष आश्लेष शिवाजीराव मोरे, सरचिटणीस जनार्दन साठे, सचिव पद्माकरराव हराळकर, सहसचिव डॉ. सुभाष वाघमोडे आणि सर्व संचालक, प्राध्यापक यांच्या वतीने शुभांगी सीतापपुरे यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.
 
Top