मुरुम शहरात रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली

मुरुम, ता. उमरगा, दि.. १०  :

  उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनाची वार्ता कळताच संपूर्ण मुरुम शहरावर शोककळा पसरली. शहरातील विविध क्षेत्रातील नागरिकांच्या वतीने रतन टाटा यांना छत्रपती शिवाजी चौकात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

 यावेळी अनेकानी श्रद्धांजलीपर भावना व्यक्त करताना देशातील आदर्श उद्योगपती, रतन टाटा यांच्या निधनामुळे संपूर्ण देशासह उद्योगविश्वावर मोठी शोककळा पसरली आहे. भारतीय उद्योगसमूहाचं एक प्रेमळ आणि सोज्वळ असे व्यक्तिमत्व हरवले. कोरोना काळात तर रतन टाटा यांनी आपले हॉटेल राज्य सरकारला रुग्णांना क्वारंटाईन करण्यासाठी मोफत दिले होते. या त्यांच्या सामाजिक व आरोग्यविषयक योगदानामुळे राज्यातील हजारो रुग्णांचा जीव वाचला.  त्यांनी टाटा ग्रुपच्या विविध कंपन्यांना यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचविले. शहरातील विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.               
 फोटो ओळ : मुरुम, ता. उमरगा येथील शिवाजी चौकात रतन टाटा यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करताना विविध क्षेत्रातील नागरिक.
 
Top