श्री महालक्ष्मी देवस्थान चिवरी येथे पार पडला पालखी मिरवणूक सोहळा

चिवरी,दि.१४:

 नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी चिवरी ता.तुळजापूर  येथिल श्री महालक्ष्मी मंदिरामध्ये  धार्मिक विधी कार्यक्रम पार पडले.

चिवरी महालक्ष्मीचे विशेष म्हणजे या ठिकाणी घट स्थापना ही दुधामध्ये केली जाते. श्री महालक्ष्मीची पालखी चिवरी गावात सायंकाळी 5 वाजता  सिमोल्लंघन खेळण्यासाठी पालखी पोतराज जाण्या, धनगरी ढोल पथक, ढोल ताश्याच्या गजरात हलगीच्या कडकडाटात गावामध्ये  जाते व शेवटी पुजारी मंडळाच्या घरी पालखी जाऊन व तेथे आरती करून आलेल्या सर्व भाविक भक्तांना प्रसादाचे वाटप करून नवरात्र महोत्सवाची सांगता केली जाते.

 पालखी सोहळ्यासाठी नागू शिंदे , अपासाहेब साखरे , मारुती भोवाळ,  सचिन माने, किसन भोवाळ, लहू पोतराज , भोवाळ पोतराज, संतराम पोतराज, शिवाजी डोंगरीबा पोतराज, सुकेश शिंदे पोतराज, भाविक व गावकरी मंडळी या सोहळ्यास उपस्तिथ होते. या शोभेचे दारूकाम करण्यात आले. नवरात्रा निमित्त महालक्ष्मी मंदिरावर विद्युत रोषणाई केली होती.
 
Top