महाराष्ट्र राज्य शिक्षण विस्तार अधिकारी संघटनेच्या उपोषणाला धाराशिव जिल्ह्यातील शिक्षण विस्तार अधिकारी यांचा सक्रिय पाठिंबा; सामूहिक रजा टाकून आंदोलनात झाली सहभागी
धाराशिव,दि.११:
आपले विविध मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण विस्तार अधिकारी संघटनेने 5 ऑक्टोबर 2024 पासून मुंबई येथील आझाद मैदान येथे उपोषण सुरू केले आहे. त्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील सर्व शिक्षण विस्तार अधिकारी यांनी सामूहिक रजा टाकून आंदोलनात सहभाग नोंदवला आहे.
या आहेत मागण्या
शिक्षण विस्तार अधिकारी यांना दरमहा कायम प्रवास भत्ता मिळावा. , शिक्षण विस्तार अधिकारी यांच्यामधून उपशिक्षणाधिकारी पदावर पदोन्नतीचा कोटा ८० टक्के एवढा करण्यात यावा. महाराष्ट्र शिक्षण सेवा गट ब ( उपशिक्षणाधिकारी प्रशासन शाखा) या पदावर पदोन्नतीची प्रक्रिया तात्काळ पार पा. त्यासाठी अंतिम सेवा जेष्ठता यादी प्रसिद्ध करावी., शिक्षण विस्तार अधिकारी हे पद ग्रामविकास विभागाकडून शालेय शिक्षण विभाग कडे वर्ग करून त्या पदाला वर्ग दोन चा दर्जा देण्यात यावा.
इत्यादी मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण विस्तार अधिकारी यांनी मुंबईतील आझाद मैदानावर दिनांक 5 ऑक्टोबर 2024 पासून उपोषण /धरणे आंदोलन सुरू केले आहेत त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील सर्व शिक्षण विस्तार अधिकारी यांनी दिनांक 9 ऑक्टोबर पर्यंत च्या सामूहिक रजा घेऊन आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला आहे. त्यासाठी ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी व राज्य संघटनेचे सल्लागार मल्हारी माने, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष सुशील फुलारी, जिल्हा संघटनेचे सरचिटणीस दत्तप्रसाद जंगम यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सुमारे 22 शिक्षण विस्तर आधिकाऱ्यांनी मुंबई येथील आझाद मैदानात वर सुरू असलेल्या आंदोलनात प्रत्यक्ष सहभाग नोंदवला. या आंदोलनाची दखल राज्य शासनाने घेतली असून शिक्षण मंत्री महोदय व संबंधित खात्याचे सचिव यांनी शिक्षण विस्तार अधिकारी यांच्या पदाधिकाऱ्या सोबत संयुक्त बैठक घेऊन संघटनेच्या प्रश्नाबाबत लगेच कार्यवाही सुरू केली आहे. त्याबाबत संघटनेकडून समाधान व्यक्त होत आहे.