नळदुर्ग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांने जिल्हास्तरीय अविष्कार-२०२४ स्पर्धेत प्रथम पारितोषीक पटकाविले
नळदुर्ग,दि.१२:
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसर, धाराशिव येथे जिल्हास्तरीय अविष्कार-२०२४ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या अविष्कार-२०२४ स्पर्धेत नळदुर्ग शहरातील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. हि स्पर्धा वेगवेगळ्या गटामधून घेण्यात आली होती. या स्पर्धेसाठी संघ व्यवस्थापक म्हणून महाविद्यालयाचे अविष्कार समितीचे समन्वयक प्रा. महेंद्र भालेराव व लेफ्ट. डॉ. अतिश तिडके यांनी काम केले. कु. निकिता कांबळे व किरण व्हंताळकर यांचे वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. उद्धव भाले यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन सुरू असून त्यांनी एग्रीकल्चर अँड ऍनिमल हजबंडरी या पीपीजी गटामधून प्रथम क्रमांक मिळविला आहे
त्याचबरोबर कु. सय्यद मोहम्मदी मुसदीक व कु. शेख सना खलील यांनी भौतीकशास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. रोहिणी महिंद्रकर व प्रा. रोहित मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन प्रकल्प तयार केला आहे आणि त्यांनी प्युअर सायन्स या यु.जी. गटातून प्रथम क्रमांक मिळविला आहे.
कला शाखाचे गवळी अमित तानाजी आणि राठोड प्रविण संजय या विद्यार्थ्यांनी इतिहास विभागाचे प्रा. सय्यद अकबर यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन अभ्यास करून ह्युमिनिटीज, लैंग्वेजेस अँड फाईन आर्ट्स या यू.जी. गटामधून सहभाग घेतला होता आणि त्यांनी प्रथम फेरी पार करून द्वितीय फेरीमध्ये स्थान मिळवले .
सर्व सहभागी स्पर्धकांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष राठोड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सत्कार समारंभासाठी नॅक समन्वयक डॉ. शिवाजी घोडके, सर्व विभागाचे विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, महाविद्यालय अविष्कार समितीचे समन्वयक प्रा. महेंद्र भालेराव आणि सदस्य लेप्ट. डॉ. अतिश तिडके व डॉ. सुभाष जोगदंडे आदी उपस्थित होते.