जिल्हास्तरीय अविष्कार स्पर्धेत माधवराव पाटील महाविद्यालयाची दिव्या सुर्यवंशी प्रथम तर सचिन खोचरे द्वितीय
मुरूम, ता. उमरगा, ता. ११ :
धाराशिव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्रात गुरुवार रोजी जिल्हास्तरीय आविष्कार स्पर्धा-२०२४ आयोजित करण्यात आली. या स्पर्धत मुरुमच्या श्री माधवराव पाटील महाविद्यालयाची एम. ए. प्रथम राज्यशास्त्र (पदव्युत्तर) विषयाची विद्यार्थिनी कुमारी दिव्या प्रकाश सुर्यवंशी ही मानव्यविद्याशाखेतून निवडणूक विषयक सुधारणा या विषयावर भितीपत्रक व पीपीटीद्वारे सादरीकरण करून जिल्हास्तरीय अविष्कार स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला.
या विद्यार्थिनीला राज्यशास्त्र संशोधन केंद्राचे समन्वयक प्रा. डॉ. महेश मोटे यांनी मार्गदर्शन केले. मेडीसीन आणि फार्मसी (पीपीजी) शाखेतून रसायनशास्त्र (पदव्युत्तर) विषयाचा विद्यार्थी सचिन खोचरे हा जिल्हास्तरीय अविष्कार स्पर्धत दुसरा क्रमांक पटकाविला.
या विद्यार्थ्याला रसायनशास्त्र संशोधन केंद्राचे संशोधन मार्गदर्शक प्रा. डॉ. आप्पासाहेब सुर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले. या दोघांच्या यशाबद्दल जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील, उमरगा जनता बँकेचे चेअरमन शरण पाटील, नगर शिक्षण विकास मंडळाचे सचिव व्यंकटराव जाधव गुरुजी, संचालक प्रा. डॉ. सतिश शेळके, प्राचार्य डॉ. अशोक सपाटे, उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार, राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सायबण्णा घोडके, रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा. राजकुमार रोहीकर, प्रा. डॉ. शिवपुत्र कनाडे, डॉ. रविंद्र आळंगे, प्रा. लक्ष्मण पवार आदींनी त्यांचे विशेष कौतुक करून अभिनंदन केले.