प्रज्वलित उमाकांत मंगरुळे यांची उपविभागीय मुख्य अभियंता झाल्याबद्ल मित्र परिवाराकडून गौरव
मुरुम, ता. उमरगा, दि. १२ : डॉ सुधीर पंचगल्ले
मुरूमचे रहिवाशी असलेले प्रज्वलित उमाकांत मंगरुळे यांची उपविभागीय मुख्य अभियंता वर्ग-१ या पदी पदोन्नती झाली. त्यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोग २०१३ मध्ये सहाय्यक अभियंता श्रेणी-२ साठी निवड झाली होती. नुकतीच त्यांची तुळजापूर येथील कृष्णा मराठवाडा बांधकाम उपविभागात नियुक्ती झाल्याबद्दल शनिवारी (ता. १२) रोजी त्यांचा मुरुमच्या मित्रपरिवार व माय बेस्ट फ्रेंड ग्रुपच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रा. डॉ. रविंद्र गायकवाड, प्रा. डॉ. सुधीर पंचगल्ले, प्रा. विश्वजीत अंबर, सहशिक्षक अशोक जाधव, ज्ञानेश्वर चौधरी, बसवराज पाटील कदेरकर, परमेश्वर जवळगे, बाबुराव खटके, सुरेश मंगरूळे, मुकूंद सुर्यवंशी, नगरसेवक अजित चौधरी, जगदीश बेंडकाळे, आसिफ कुरेशी, सतिश शेळके, संजय आळंदी, विनोद गायकवाड, दत्ता हुळमुजगे, बाळासाहेब खंडागळे आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे आयोजन ओम जाधव व आनंद जाधव यांनी केले.