शहरातील विविध विकास कामासाठी १ कोटी ४० लाख निधी उपलब्ध करून दिल्याबद्ल महाआरतीचे आयोजन
मुरुम, ता. उमरगा, दि. १३
सोनार गल्ली येथील माऊली मंदिराच्या सभागृहात मंदिर परिसराच्या विकास कामासाठी निधी मंजूर केल्याबद्दल महाआरती सोहळा शुक्रवार रोजी आयोजित करण्यात आला. प्रारंभी महायुतीच्या नेत्यांनी पदयात्राद्वारे शिवाजी चौकापासून बसवेश्वर चौक मार्गे नेहरुनगर भागातील वीरशैव कक्कया सभा मंडपाकरिता २० लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याने त्याचे भूमिपूजन करुन महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून सर्व मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले.
यावेळी माजी खासदार रविंद्र गायकवाड, आमदार ज्ञानराज चौगुले, शिवसेना युवानेते किरण गायकवाड, बळी मामा सुरवसे, जगन्नाथ पाटील आदींचा समाज बांधवाकडून सत्कार करण्यात आला. या प्रसंगी ज्ञानराज चौगुले व रविंद्र गायकवाड यांनी समाज बांधवांना संबोधित केले. नेहरुनगर येथून भीमनगर मार्गे शिंदे गल्ली येथे पदयात्रा मार्गस्थ झाली. या ठिकाणच्या सभा मंडपासाठी ४० लाख रुपयांचा निधी दिल्याने आमदारांचे स्वागत करून नागरिकांनी आभार मानले. त्यानंतर सदर पदयात्रा भीमनगर मार्गे भवानी आड येथील तुळजाभवानी मंदिराजवळ आली. तेथील महादेवी मंदिराचे सर्व पदाधिकाऱ्यांनी दर्शन घेऊन २० लाख रुपयांच्या सभागृहाच्या कामाचे भूमिपूजन रविंद्र गायकवाड, ज्ञानराज चौगुले, विरक्त नारळ मठाचे मठाधिपती चरमुर्ती आप्पा यांच्या हस्ते करण्यात आले. ही पदयात्रा अशोक चौकात आली त्यावेळी रविंद्र गायकवाड यांनी त्यांच्या राजकीय वाटचालीत जपलेल्या साधेपणाचे सर्वसामान्य नागरिकांना दर्शन झाले. त्यांनी अशोक चौकातील कट्ट्यावर बसून मनसोक्त चर्चा केली. या चौकात महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले.
त्यानंतर सोबाची गल्ली, सोनार गल्ली, शेळके गल्ली मार्गे सुभाष चौकात जाणाऱ्या सिमेंट रस्ता करिता ४० लाख रुपयांच्या निधी मंजूर केल्याबद्ल नागरिकांनी मान्यवरांचा सत्कार करुन आभार व्यक्त केले. ही पदयात्रा पुढे शहरातील गावठाण भागातील टिळक चौकात बसवण्यात आलेल्या देवीची महाआरती मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. नवरात्र उत्सव समितीकडून रविंद्र गायकवाड, ज्ञानराज चौगुले, किरण गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. पुढे किसान चौकात पदयात्रा आली असता अंबाबाई मंदिरातील देवीची महाआरती मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. किसान चौक येथे सुशोभीकरण तसेच सभागृहासाठी देण्यात आलेल्या ४० लाख रुपयांच्या निधीबद्ल किसान गणेश मंडळ व नागरिकांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यानंतर पदयात्रा सोनार गल्लीतील माऊली मंदिराकडे मार्गस्थ झाली. येथील बाळकृष्ण मंदिरात रिबीन कापून उद्घाटन करुन विधिवत महाआरती करुन मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. या ठिकाणी आयोजित समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. ज्ञानराज चौगुले होते. यावेळी युवासेना मराठवाडा पक्ष निरीक्षक किरण गायकवाड, शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पणुरे, उमरगा तालुकाप्रमुख बळीमामा सुरवसे, लोहारा तालुकाप्रमुख जगन्नाथ पाटील, राष्ट्रवादीचे नेते तानाजी फुगटे, भाजप व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत मिनीयार, शिवसेनेचे नेते चंद्रशेखर मुदकण्णा, व्यंकट पाटील यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संयोजक चंद्रशेखर मुदकण्णा, श्रीकांत मिनियार यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी आ. ज्ञानराज चौगुले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, मी जे करतो तेच बोलतो. जे बोलतो ते करतोच, असे म्हणत विविध विकास कामांना दिलेल्या निधीबद्दलची पार्श्वभूमी सांगून यापुढेही आपण जे काम सांगाल. ते पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही, असे म्हणत आपण वर्षभरासाठी सालगडी नेमतो तसा मी तुमचा या मतदारसंघाचा पाच वर्षासाठीचा सालगडीच आहे. मी मतदारांचा कधीच मालक होणार नाही. त्यांची सेवा करणे हे माझे कर्तव्य समजतो. आताच या ठिकाणी शेतकरी व नागरिकांनी विविध कामाबाबत मला निवेदने दिली आहेत. त्या सर्वच निवेदनांना मी माझ्या कामातून उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. आमदारांनी शहराच्या विविध विकास कामासाठी एक कोटी चाळीस लाख रुपयांचा निधी दिल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
शिवसेना शहर प्रमुख सुरेश मंगरुळे, तालुका उपप्रमुख राजेंद्र शिंदे, अमृत वरनाळे, शाहूराज शिंदे, भीमराव फुगटे, बाळासाहेब खंडागळे, युवा सेना शहरप्रमुख भगत माळी यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक दत्ता इंगळे यांनी केले. सूत्रसंचालन मोहन जाधव तर आभार भगत माळी यांनी मानले. यावेळी बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.