अखेर विजयादशमीच्या मुहूर्तावर अपर तहसिल कार्यालयाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते उदघाटन

नळदुर्ग,दि.१४: नवल नाईक 

शहर व परिसरातील ७० गावातील नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या बहुचर्चित 
नळदुर्ग येथे नव्याने मंजूर झालेल्या अपर  तहसील कार्यालयाचे विजयादशमीच्या मुहूर्तावर आमदार राणाजगजजितसिंह पाटील यांच्या हस्ते प्रतिनिधीक स्वरूपात उद्घाटन करण्यात आले, आमदार पाटील यांनी सर्वांचे मत जाणून घेत ऐतिहासिक चावडी चौकात असलेल्या नगरपालिकेच्या सभागृहात हे अपर तहसील कार्यालय सुरू करण्यात येत आहे.  तहसीलदार व लिपिक ही दोन पदे येथे मंजूर असून याच ठिकाणी तलाठी कार्यालय ही मागील काही महिन्यापूर्वी सुरू करण्यात आले आहे. यामुळे जुन्या बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना याचा व्यवसाय वृद्धीच्या दृष्टीने लाभ होणार आहे.