पृथ्वीराज केवलचंदजी जैन यांचे निधन
सोलापूर,दि.२९ :
श्री पृथ्वीराज केवलचंदजी जैन यांचे अल्पशा आधाराने निधन झाले आहे.ते सोलापूर युनिटी मल्टिकॉन्स प्रा.लि कंपनीचे दिवंगत संचालक भरत जैन यांचे वडील होत.त्याच्या पश्चात सुन युनिटीच्या संचालिका वैशालीताई भरत जैन, मुलगा श्री सुहास जैन, दोन मुली,सुना नातवंडे असा परिवार आहे.
अंत्ययात्रा मंगळवार दि. 29 ऑक्टोंबर रोजी सकाळी10:30 वाजता निघणार आहे. त्यांच्या पार्थिवावर मोदी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
त्यांच्या आत्म्यास चिरशांती व सद्गती लाभो हीच युनिटी परिवारातर्फे ईश्वरचरणी प्रार्थना व अखेरचा निरोप. त्यांच्या परिवारास या दुःखद समयी या परिस्थितीतून सावरण्याचे ईश्वर त्यांना बळ देवो अशी श्रध्दाजली शोकाकुल युनिटी मल्टीकॉन्सचे मुख्य संचालक कफील श. मौलवी श्री जयधवल अ. करकमकर व परिवारानी वाहिली.