अंजनी प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांचा 26 वर्षांनंतर एकत्रित येत स्नेह मेळावा उत्साहात  संपन्न 

नळदुर्ग,दि.१२:

शहरातील अंजनी प्रशालेत शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचा 26 वर्षांनंतर एकत्रित येत स्नेह मेळावा उत्साहात  संपन्न झाला.

तब्बल 26 वर्षांनी सर्व वर्गमित्र एकत्र जमा झाले. 1998 ची दहावीची बॅच नळदुर्ग शहराच्या उत्तरेस असलेल्या 
युनिवंडर रिसॉर्ट येथे सदरील कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी सर्वांनी स्नेहभोजन व जुन्या आठवणीला उजाळा दिला व रिसॉर्ट मधल्या सर्व खेळांचा आनंद लुटला.


 यामध्ये संदीप सुरवसे, दीपक जाधव ,संतोष व्हटकर, वसीम सौदागर, जयवंत मुळे, अमित शेंडगे, गणेश शेंडगे, संतोष ढोकळे, अमोल गायकवाड, भालचंद्र मते, बालाजी जाधव, धनाजी ढाले ,दिपाली सुरवसे, सुनिता चव्हाण, माया गवळी, शिक्षक प्रदीप कदम,  राठोड , उषा आवटे , यांच्यासह माजी विद्यार्थी उपस्थित होते .
सूत्रसंचालन संतोष व्हटकर व आभार दिपाली सुरवसे यांनी मानले.

  
 
Top