भाजप युवा मोर्चाच्या वतीने नळदुर्ग शहरात आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ रॅली 
         
नळदुर्ग,दि.१२: 

तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे  महायुती भाजपचे उमेदवार राणाजगजीतसिंह पाटील  यांच्या प्रचारार्थ नळदुर्ग शहर भाजप युवा मोर्चाच्या वतीने रॅली काढण्यात आली. 

या रॅलीचे शुभारंभ शहरातील व्यासनगर येथील श्री 
उत्तरेश्वर  महादेव मंदिरात श्रीफळ वाढवून करण्यात आले. ही रॅली महामार्ग, बसस्थानक मार्गे  शहरातील मुख्य रस्त्यावरून, शास्त्री चौक, भवानी चौक, ब्राह्मण गल्ली, गवळी गल्ली, मराठा गल्ली ,किल्ला गेट, चावडी चौक ते भाजप कार्यालयात समारोप  करण्यात आले.
 भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात "युवा संवाद" या कार्यक्रमांतर्गत  भाजप युवा मोर्चाचे प्रमुख अतिथी यांनी युवकांना मार्गदर्शनपर सांगितले की, राज्यातील महायुतीचे सरकार गेल्या अडीच वर्षांमध्ये जे विकास कार्यामध्ये सामान्य जनतेसाठी ज्या काही योजना आणलेल्या आहेत. या सर्व तळागाळापर्यंत पोहोचून  आमदार राणाजगजितसिंह  पाटील यांनी मतदारसंघासह नळदुर्गसाठी 154 कोटी पेक्षा जास्त विकास निधी आणलेला आहे .त्या सर्व विकास कामाची माहिती शेवटच्या नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे सांगुन
नळदुर्ग शहराची प्रमुख मागणी असलेला तालुक्याचा प्रश्न मार्गी लागावा, यासाठी तालुक्याची पहिली पायरी म्हणून अप्पर तहसील कार्यालय मंजूर करून घेतले. त्यानंतर नळदुर्ग शहरासाठी नवीन पारिपुरवठा योजना मंजूर करून घेतले .त्याचे काम सुरू आहे .तसेच बसव सृष्टी, दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक  यांचे स्मारक तसेच मराठवाडा मुक्ती संग्रामाचे स्मारक हे मोठे कार्य आमदार पाटील यांच्या माध्यमातून झालेले आहे. असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रमिक पोतदार, आभार भिमाशंकर बाताले यांनी मानले.

राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य शुभमसिंग, देवांश शहा, दत प्रसाद , भाजपयुमोचे प्रदेश  उपाध्यक्ष अरुण पाठक भाजयुमोचे धाराशिव जिल्हाध्यक्ष राजसिहा निंबाळकर,  जिल्हा उपाध्यक्ष दयानंद मुंडके, माजी नगराध्यक्ष उदय जगदाळे, बंडू पुदाले,तालुका सरचिटणीस श्रमिक पोतदार, तालुकाध्यक्ष आनंद  कंदले, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष गणेश मोरडे, अक्षय भोई. शहराध्यक्ष धीमाजी घुगे, पद्माकर घोडके , रियाज शेख, बबन चौधरी , मुद्दसर शेख, संजय
 जाधव,विजय ठाकूर, सागर हजारे ,आकाश कुलकर्णी, विशाल डुकरे ,उमेश नाईक ,ओम बागल, अक्षय हजारे, अमोल डुकरे ,प्रवीण चव्हाण, अजय दासकर, राम जाधव ,वीरेंद्र बेडगे ,योगेश पवार,  राहुल दासकर, स्वप्निल गव्हाणे, रवी ठाकूर, प्रमोद कोकणे ,शिरीष डुकरे, शिवाजी सुरवसे, अजय ठाकूर, किरण दुसा ,राहुल जाधव, श्याम पवार, सुयश पुराणिक, अमर बनसोडे, रोहीत डुकरे, विकी डुकरे, आदीसह शंभर पेक्षा अधिक युवकांनी मोटारसायकल रॅलीत सहभागी झाले होते.
 
Top