प्रहार जनशक्तीचे उमेदवार अण्णासाहेब दराडे यांच्या प्रचारासाठी कुटूंबियांसह मित्र परिवाराची मतदारसंघात धाव
तुळजापूर,दि.१२ :
तुळजापूर विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचार शिगेला पोहोचला आहे. महायुती व महाविकास आघाडी , प्रहार जनशक्ती,समाजवादी पार्टी, वंचितसह इतर उमेदवार आपापल्या परीने प्रचार करीत आहेत.यापैकी प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार अण्णासाहेब दराडे यांच्या प्रचारासाठी कुटूंबातील सर्व पुरुष व महिला सदस्यासह नातेवाईक, मित्रपरिवार मतदारसंघातील गावे,वाडी,वस्ती, तांड्याना भेट देत होम टू होम प्रचारात झोकुन दिले आहे.
उमेदवार अण्णासाहेब दराडे हे गावांमध्ये प्रत्येक घराघरात जाऊन मतदारांना भेटीगाठी घेऊन झंझावाती प्रचार सुरू केलेला आहे. ज्या हक्काने मत मागायला आलोय त्याच हक्काने पुढील काळात तुमची कामे करण्यासाठी सुद्धा तुमच्या दारात येईन असा शब्द प्रत्येक घराघरात, प्रत्येक दारात जाऊन अण्णासाहेब दराडे मतदारांना देत आहेत.
दोन दिवसांमध्ये ढेकरी ,शिराढोण, अमृतवाडी ,मसला खुर्द, दहिवडी ,काटी, सावंतवाडी, खुंटेवाडी, वानेवाडी, सावरगाव, केमवाडी, जळकोटवाडी, वडगाव काटी, तामलवाडी, पिंपळा बुद्रुक, पिंपळा खुर्द, देवकुरुळी, धोत्री ,सुरतगाव ,मगर सांगवी, मांजरवाडी, माळुंब्रा, कदमवाडी, गोंधळवाडी, कुंभारी इत्यादी 30 गावांना अण्णासाहेब दराडे यांनी घरोघरी भेट दिलेली आहे.
तर दुसरीकडे अण्णासाहेब दराडे यांच्या पत्नी ज्योतीताई दराडे यांनी दोन दिवसात १५ गावाना भेट देत गावोगावी, घरोघरी प्रत्येक मतदारापर्यंत त्यांच्या दारापर्यंत पोहोचून मतदारांना आपली बाजु पटवुन सांगत आहेत. दराडे यांच्या आई आशाबाई यांनी गेली दोन दिवसांमध्ये वेगवेगळ्या दहा गावांना भेटी देऊन घरोघरी जाऊन प्रचार करत असून सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पोराला आपण आशीर्वाद द्यावा अशी विनंती करत आहेत.
दराडे यांचे भाऊ आनंद दराडे यांनी 21 गावांना भेटी देऊन प्रचारात ताकद निर्माण केली आहे.
अण्णासाहेब दराडे यांचे पूर्ण कुटुंबच प्रचार यंत्रणेमध्ये पूर्णपणे ताकदीने सहभागी झाले असून आई , पत्नी , भाऊ, चुलत भाऊ , मामाची मुलं , मावस भाऊ मित्र सर्व पूर्ण परिवार ताकदीने उतरले आहे. मतदारसंघांमध्ये वेगवेगळ्या 20 टीम तयार करून सक्रिय झालेल्या असून प्रत्येक टीम गावगावी जाऊन होम टू होम प्रचार ताकदीने करत प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचताना दिसत आहेत.