काळ्या बाजारात जाणारे धान्याचे दोन ट्रकसह दोघा चालकास पोलिसांनी घेतले ताब्यात
नळदुर्ग शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील धान्य कर्नाटक राज्यातील रायचूरहुन छत्रपती संभाजीनगरकडे नळदुर्ग मार्गे घेवून जाणा-या दोन ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतले.याप्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकास ताब्यात घेतले असून नळदुर्ग पोलिसांत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील गंधोरा शिवारातील तांबोळी धाब्याजवळ कर्नाटक पासिंगच्या दोन ट्रक मधून जाणारा जाणारा ट्क क्र. केए २८ डी ८६९९ व केए.३२ डी ३५६७ या दोन ट्रक पकडण्यात आल्या. स्थानीक गुन्हे शाखा धाराशिव यांनी ही कारवाई सोमवार दि.११ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता केली.
या दोन ट्रक पोलीसांकडून नळदुर्ग येथील महामार्ग पोलीस केंद्र येथे उभ्या करण्यात आल्या असून पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना तपासणीसाठी बोलवण्यात आले आहे. नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांनी या कारवाईस दुजोरा दिला आहे. मात्र सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील आधिकारी या धान्याची तपासणी केल्यानंतर किती धान्य आहे याची माहिती मिळणार आहे.
सर्व संशयास्पद -
सदर दोन्ही ट्रक हे कर्नाटक हद्दीवरील आरटीओ चेक पोस्ट व उमरगा पोलीस स्टेशन बरोबरच नळदुर्ग पोलिस स्टेशन हद्द पार करीत असताना स्थानिक गून्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेतल्याने नागरिकांतून तर्क वितर्क वर्तविला जात आहे.
पोलिसांनी ताब्यात घेतलेले दोन्ही ट्रक हे 14 चाकी असून वजन वाहतूक क्षमता प्रत्येकी अकरा टन असून दोन्ही ट्रक धान्याच्या पोत्यांनी भरलेले आहेत, मात्र ट्रक चालकाने पोलिसांना दिलेल्या कागदपत्रात दोन्ही ट्रक मधील गव्हाचे वजन 9 टन 3 क्विंटल नमूद आहे. वास्तविक पाहता दोन्ही ट्रकमध्ये एकंदरीत वीस टनापेक्षा जास्त गहू असल्याची माहिती समोर येत आहे.