नळदुर्ग अपर तहसीलमुळे तालुका दृष्टीपथात- राणाजगजितसिंह पाटील
नळदुर्ग, दि.११
तुळजापूर तालुक्यातील नंदगाव येथे शनिवार रोजी रात्री महायुतीचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांची प्रचार सभा संपन्न झाली.
नळदुर्ग येथे अपर तहसील कार्यालय मंजूर झाले असून नळदुर्ग तालुका निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच नळदुर्गसह परिसराचा विकास करण्यासाठी होर्टी, अलियाबाद येथे औद्योगिक वसाहत निर्माण करणे, पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार, महापुरूषांचे विचार जपण्यासाठी बसवसृष्टी, माजी मुख्यमंत्री कै.वसंतराव नाईक स्मारक आदीसह नळदुर्ग येथे शादीखाना, महत्वकांक्षी पाणीपुरवठा योजनेचे सुरू असलेले काम यामुळे आपल्या भागाचा कायापालट होणार आहे. असे राणाजगजितसिंह पाटील यावेळी म्हणाले.
राणाजगजितसिंह पाटील यांच्यासारखा सर्वसमावेशक नेताच आपल्या भागाचा सर्वांगिंण विकास करू शकतो, महाराष्ट्रात महायुतीचेच सरकार येणार आहे. आशा वेळी राणाजगजितसिंह पाटील यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन नंदगावचे माजी जि.प. सदस्य तथा राष्ट्रवादी काॕग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांनी केले.
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य सिद्धेश्वर कोरे, भिवाजी इंगोले, गणेश सोनटक्के, संतोष बोबडे, दीपक आलुरे, विवेकानंद मेलगिरी ,अंगद जाधव, रेखा लामजणे ,मीनाक्षी मोरे, महादेवी चिनगुंडे, सागर चौगुले, अमोल अलगुडे, राम पाटील ,मोहन मोरे, पांडू शिंदे, धर्मराज तुपे आदी उपस्थित होते.