नळदुर्ग शहरातील १७ मतदान केंद्रावर १६ हजार ७९० मतदार मतदानाचे हक्क बजावणार
नळदुर्ग, दि.१९ :
नळदुर्ग शहरात १७ मतदान केंद्र असून या मतदान केंद्रावर एकुण १६ हजार ७९० मतदार आहेत. उदया बुधवार दि.२० नोव्हेंबर रोजी तुळजापूर विधानसभा मतदारसंघ निवडणुकीकरिता मतदान होत आहे.
नळदुर्ग शहरात स्त्री मतदारंची संख्या ८ हजार १८२ तर पुरूष मतदार ८ हजार ६०८ आहेत. एक हजार २४७ एवढे सर्वाधिक मतदार येथील जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या सभागृहातील केंद्र क्र.३६६ येथे तर सर्वात कमी मतदार ६६३ एवढे जि.प. कन्या प्रशाला खोली क्र.२ (प्राथमिक आरोग्य केंद्रासमोरील शाळा) येथे आहेत.
यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वसंतनगर याठिकाणी दोन बूथ आहेत. या ठिकाणी दुर्गानगर (वडारवाडा) व वसंतनगर येथील मतदार, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा इंदिरा नगर येथे इंदिरा नगर, झोपडपट्टी येथील मतदार, माऊलीनगर येथील जि.प.के.प्राथमिक शाळेत व्यासनगर, माऊलीनगर, शासकीय गोदाम, नगरपरिषद सभागृह बाजू व साळूंके नगरचे मतदार, न.प. सभागृह येथे गवळी गल्ली, लिंगायत गल्ली व चावडी समोरील उत्तर बाजूच्या भागातील मतदार, न.प. व्यायाम शाळा मराठा गल्ली येथे भोईगल्ली. लोहारगल्ली,मराठागल्ली व आसार मस्जिद भागातील मतदार, न.प. सांस्कृतिक सभागृह मराठा गल्ली येथे महमद पनाह गल्ली, सोनार गल्ली व बेडगे गल्ली येथील मतदार, जि.प. कन्या प्रशाला (आरोग्य केंद्र समोर) तीन केंद्रात पठाण गल्ली, काझी गल्ली, मुलतान गल्ली, किल्ला गेट भागातील मतदार, जिल्हा परिषद कन्या प्रशाला (नवीन इमारत) येथे दोन केंद्रात कुरेशी गल्ली, सरकारी दवाखाना, साठे नगर, किल्ल्यातील वस्ती, लोकमान्य वाचनालय ते चावडी पूर्व भाग, हत्तीगल्ली, ढोरगल्ली, चांभारगल्ली येथील मतदार, हुतात्मा स्मारक येथे गवळीगल्ली, चावडी समोरील भाग, दवाखाना, लिंगायत गल्ली येथील मतदार, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिमनगर येथील केंद्रात इनामदार गल्ली, कुरेशी गल्ली (काही भाग), जिल्हा परिषद कन्या प्रशाला येथे दोन केंद्रात भिमनगर व बुद्धनगर, रहीम नगर, रामलीलानगर, प्राध्यापक काॕलनी येथील मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
२४१ तुळजापूर विधानसभा मतदारसंघ
तुळजापूर विधानसभा मतदारसंघात एकूण मतदार संख्या ३ लाख ८० हजार ८०६ असुन त्यापैकी पुरुष मतदार २ लाख १०६ तर स्त्री मतदार १ लाख ८० हजार ६९४ एवढे आहे. या मतदारसंघात धाराशिव तालुक्यातील ७२ गावे, तुळजापूर तालुक्यातील १२३ आहे . तुळजापूर व नळदुर्ग नगरपालिका असुन एकुण १९५ गावाचा मतदारसंघात समाविष्ट आहे.
एकूण मतदान केंद्र ४१० आहेत.