तुळजापूर विधानसभेसाठी नळदुर्ग शहरात झाले  सरासरी ५८ टक्के मतदान 

नळदुर्ग, दि.२० : शिवाजी नाईक 

तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रिया बुधवार दि.२० नोव्हेंबर रोजी नळदुर्ग शहरात शांततेत पार पडली. १७ मतदान केंद्रावर एकूण १६ हजार, ७९० मतदारापैकी ९ हजार ७२० एवढे मतदान झाले. त्याची सरासरी ५७ .९० टक्के एवढी असुन या निवडणुकीत ४२ टक्के मतदारांनी निवडणुकीकडे पाठ फिरविल्याचे चित्र समोर आले आहे..
बुधवार रोजी विधानसभेसाठी मतदान होत असल्याने आदर्श मतदान केंद्र म्हणून नगरपरिषद व जि प केंद्रीय प्राथमिक शाळा येथील मतदान केंद्राची आकर्षक सजावट करण्यात आली होती.

नळदुर्ग शहरात एकूण ५७.९० टक्के एवढे मतदान झाले असून शहरात एकूण १६ हजार ७९० पैकी ९७२० एवढे मतदान झाले. नळदुर्ग शहरात एकूण १७ मतदान केंद्र होते. शहरातील ३५१ क्रमांकाच्या मतदान केंद्रात ११३२ पैकी ७६८ म्हणजे ६७.९० टक्के एवढे सर्वाधिक मतदान झाले  असून ३६५ क्रमांकाच्या मतदान केंद्रावर सर्वात कमी म्हणजे ४९.७० टक्के एवढे सर्वात कमी मतदान झाले. या ठिकाणी १ हजार १९९ पैकी ५९६ मतदान झाले. दिवसभरात माहायुतीचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील, मल्हार पाटील,  महाविकास आघाडीचे धिरज पाटील यांनी शहरात भेट देवून परिस्थिती जाणून घेतली.  शहरात क्षेत्रिय अधिकारी देंवेंद्र घोंगडे यांच्यासह,६५ अधिकारी, कर्मचारी, पोलीस यांनी मतदान शांततेत पार पडेपर्यंत कार्यरत होते.

नळदुर्ग शहरातील मतदान केंद्र निहाय झालेले मतदान 

मतदान केंद्र क्रमांक 350 येथे एकूण 905 मतदानापैकी 529 एवढे मतदान झाले .ते सरासरी 58.3 टक्के मतदान  आहे. मतदान केंद्र 351 वर (एकूण1132 मतदानापैकी 768 मतदान झाले) 67.9 टक्के एवढे, मतदान केंद्र 352 वर (1111 पैकी 630 मतदान झाले) 56 .7 टक्के, मतदान केंद्र 353 वर (1184 पैकी 673) 56.8 टक्के, मतदान केंद्र 354 वर (1200 पैकी 684) 57 टक्के, मतदान केंद्र 355 वर (965 मतदारांपैकी 561) 58.10 टक्के, मतदान केंद्र 356 वर (916 मतदानापैकी 506) 52. 35 टक्के, मतदान केंद्र 357 वर (1123 मतदानापैकी 605) 53.8 टक्के, मतदान केंद्र 358 वर (668 पैकी 396) 59.25 टक्के, मतदान केंद्र 359 वर (1173 मतदारापैकी 759) 64 टक्के मतदान केंद्र 360 वर (714 मतदानापैकी 412) 57. 8 टक्के, मतदान केंद्र 361 वर (816 पैकी 482)  59टक्के, मतदान केंद्र 362 वर (1016 पैकी 574) 56 टक्के, मतदान केंद्र 363 वर (728 पैकी 481) 66.10 टक्के, मतदान केंद्र 364  वर (693 पैकी 418) 60.40 टक्के, मतदान केंद्र 365 वर (1199 मतदानापैकी 596) 49 टक्के, मतदान केंद्र 366 वर (1247 पैकी 646 ) 57.8 टक्के मतदान झाले आहे.

नळदुर्ग शहरातील एकाच वार्डातील मतदारांची नावे वेगवेगळ्या मतदान केंद्रावर आल्यामुळे मतदारांना  मतदान केंद्र शोधण्यासाठी अडचण निर्माण झाली. त्यामुळे मतदारांची गैरसोय होताना दिसून आले.

 
Top