महायुती भाजपचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांचा दुस-यांदा दणदणीत विजय झाल्याने नळदुर्ग येथे जल्लोष
नळदुर्ग, दि.२४:
तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे महायुती भाजपचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांचा दुस-यांदा दणदणीत विजय झाल्याने नळदुर्ग शहर भाजपा व महायुतीकडून नळदुर्ग शहरातून विजयाची भव्य रॅली काढण्यात आली .गुलालाची मुक्त उधळण करत, फटाक्याची आतीषजी करत जल्लोष साजरा केला.
या रॅलीचे शुभारंभ शहरातील भवानीनगर येथील बाळकृष्ण मंदिर येथून करण्यात आले. ही रॅली महामार्ग, बसस्थानकमार्गे शहरातील मुख्य रस्त्यावरून, शास्त्री चौक, भवानी चौक, ब्राह्मण गल्ली, गवळी गल्ली, मराठा गल्ली ,किल्ला गेट, चावडी चौक, माऊलीनगर येथे समारोप करण्यात आला.