तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील महायुती भाजपचे उमेदवार आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रचारासाठी नळदुर्ग शहरात गुरुवार दि. 14 नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता केंद्रीय कॅबिनेट मंत्री ना. नितीन गडकरी यांची जाहीर सभा होणार आहे.
भाजप महायुतीचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना नितीन गडकरी यांची जाहीर सभा नळदुर्ग शहरातील अक्कलकोट रोड मरीआई मैदानावर: गुरुवार दि. १४ नोव्हेंबर , सकाळी १० वाजता होणार आहे.या कार्यक्रमास धाराशिव भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, ॲड मिलिंद पाटील, माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, माजी आमदार सुजितसिंह ठाकुर, दत्ता कुलकर्णी, तुळजापूर तालुका अध्यक्ष संतोष बोबडे, ॲड दीपक आलुरे, रामदास कोळगे, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
हेलिपॅडची तयारी अंतीम टप्प्यात
नळदुर्ग शहरातील महामार्गालगत असलेल्या बालाघाट शिक्षण संस्थेच्या कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालयाच्या मैदानावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे हेलिकॉप्टर उतरण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. याठिकाणी गेल्या दोन दिवसापासून मैदानाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. तात्पुरते हेलिपॅड करण्याचे काम बुधवार दि.१३ नोव्हेंबर रोजी अंतिम टप्प्यात आले आहे. या कामाची पाहणी भाजपचे नेते सुशांत भूमकर, शहराध्यक्ष धिमाजी माजी घुगे यांनी पाहणी केली.