महाविकास आघाडीचे उमेदवार ॲड धिरज कदम - पाटील यांच्या प्रचारार्थ नळदुर्ग शहरात कार्यकर्ते घरोघरी प्रत्यक्ष भेटीवर दिला भर

नळदुर्ग,दि.१३:

नळदुर्ग येथे तुळजापूर विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार ॲड धिरज कदम - पाटील यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन  मतदारांची भेटी घेत आहेत.

जाहीरनामाचे पत्रक वाटप करुन महाविकास आघाडीचे उमेदवार ॲड धिरज पाटील यांच्या कार्याविषयी नळदुर्ग शहरातील प्रत्येक प्रभागांमध्ये घरोघरी जाऊन कार्यकर्ते माहिती देत आहेत. नळदुर्ग शहरातील वसंतनगर, दुर्गानगर , इंदिरानगर व्यासनगर, ठाकरेनगर व करपेनगर आदीसह इतर ठिकाणी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पदयात्रा काढून होम टू होम जाऊन प्रचार करताना दिसत आहेत.
 महाविकास आघाडीचे नळदुर्गचे कार्यकर्ते संदीप सुरवसे, प्रशांत पुदाले ,जयवंत मुळे, आनंद पुदाले, धनराज गायकवाड, सुनील डुकरे, शिवराज धरणे, विनोद कांबळे, संतोष पुदाले, सरदारसिंग ठाकूर, शाम कनकधर , नेताजी महाबोले, दत्ता राठोड, लक्ष्मण चव्हाण ,यांच्यासह कार्यकर्ते प्रचारात  सहभागी झाले आहेत.
 
Top