महंत श्री. तुकोजी बुवा व माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते तुळजापूर शुगर कारखान्याचा भव्य मोळी पूजनाचा कार्यक्रम थाटात संपन्न
तुळजापूर,दि.१२:
तुळजापूर शुगर प्रा.लि हा कारखाना लवकर उभा करुन मोळी पूजनाचा कार्यक्रम होत असल्याचे आनंद व्यक्त करत चेअरमन ॲड अनिल काळे यांनी या कारखान्याची निर्मिती नफा मिळवण्याच्या उद्देशाने नव्हे, तर शेतकऱ्यांच्या व्यथा दूर करण्यासाठी आपल्या भागात हक्काच्या कारखान्यात ऊस देता यावा, यासाठी केली असल्याचे स्पष्ट करत शेतकऱ्यांच्या उसाला शाश्वत भाव मिळेल आणि कारखाना शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहील अशी ग्वाही आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी दिली.
रविवार रोजी श्री तुळजाभवानी मंदिराचे मुख्य महंत श्री. तुकोजी बुवा व माजी आमदार श्री. सुजितसिंह ठाकूर यांच्या शुभहस्ते तुळजापूर शुगर गुळ पावडर कारखान्याचा पहिल्या गळीत हंगामाचा भव्य मोळी पूजनाचा कार्यक्रम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडले.
कारखान्याचे चेअरमन ॲड अनिल काळे यांनी प्रास्ताविकपर बोलताना सांगितले की, कारखान्याच्या स्थापनेमुळे काटी-सावरगाव गटातील शेतकऱ्यांना न्याय मिळणार आहे. आमदार सुजितसिंह ठाकूर हे माझ्ये फॅमिली मेंबर आहेत. त्यांच्यावर कोरोना काळात घात झाला व त्याच काळात माझे वडील सुखदेव अण्णा काळे यांचेही निधन झालं .या धक्क्यातून सावरून अतिशय कठीण काळात हा कारखाना उभा केला. या भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या गैरसोयी व अडचणी दूर करण्यासाठी , त्याचबरोबर ऊसाला योग्य भाव देऊन वजन काटा न मारता वेळेवर उसाचे पेमेंट करणे हे माझे ध्येय आहे. कारखान्याचे पहिले गाळप हंगाम यशस्वी करण्याकरिता कारखान्याचे कामगार आणि ऊस उत्पादक शेतक-यांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. हा कारखाना चालू करण्यासाठी आई वडिलांचा आशीर्वाद व माझे सासरे चंदरराव कोकाटे व माझे कुटुंबिये यांनी खूप सहकार्य केले. कारखान्याचे संचालक आदित्य काळे व ऋषी वडगावकर यानीही प्रयत्न केला तर एसबीआय बँकेनेही वेळेत कर्ज उपलब्ध करुन दिल्याबद्दल काळे यांनी बँकेचे आभार मानले.
या कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून भाजपा जिल्हा अध्यक्ष संताजी चालुक्य, श्री. हनुमंत तात्या मडके, श्री. दत्ताभाऊ कुलकर्णी, श्री. सुधीर अण्णा पाटील, विनोद गपाट, प्रवीण पाठक, ॲड राम गरड , डॉ मनोज घोगरे, नागेश नाईक, गुलचंद व्यवहारे, डॉ. कोकाटे, संजय पटवारी, राजकुमार पाटील, प्रभाकर मुळे, सुहास साळुंके, विकास मलबा, सागर पारडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी संताजी चालुक्य पाटील हणमंत तात्या मडके तुळजाभवानी देवीचे मुख्य महंत तुकोजी बुवा यानीही आशीर्वाद देऊन पुढील काळात कारखाना प्रगतीपथावर नेण्यासाठी सदिच्छा दिल्या.