माजी सरपंच ज्ञानेश्वर बिराजदार यांचे‌ दु:खद निधन 

वागदरी,दि.२९ :

वागदरी ता.तुळजापूर येथिल माजी सरपंच तथा जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर बिराजदार यांचे दि.२८ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री  ११ वाजण्याच्या दरम्यान वयाच्या ७५ व्या वर्षी हृदय विकाराच्या झटक्याने  निधन झाले. ते पोलिस पाटील बाबूराव बिराजदार यांचे वडील होत.

त्यांच्या पश्चात दोन मुले एक मुलगी सुना जावई नातवंडे असा परिवार आहे. माजी सरपंच कै.ज्ञानेश्वर बिराजदार हे सामाजिक जाणीव असलेले कार्यकर्ते होते, त्यांनी ग्रा.प.सदस्य, माजी सरपंच म्हणून गावांतील लोकांची  सेवा केली.गावात अनेक विकासात्मक कामे केली आहेत.ते स्टॅम्प रायटर्स म्हणून ही परिचीत होते.
दि.२९ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ११.३०.वा.दरम्यान त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले.याप्रसंगी शोकाकुल वातावरणात उपस्थित मान्यवर व ग्रामस्थांनी त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली.
 
Top