नळदुर्ग: म्हशी पळविण्याच्या स्पर्धेत  प्रथम पारितोषिक विकास भोसले  व विजय सरोदे यांना विभागुन तर किल्ला बांधणी स्पर्धेत प्रथम पारितोषिक राजमुद्रा ग्रुप भोई गल्ली

नळदुर्ग,दि.०४

 

दिपावली भाऊबीज निमित्त नळदुर्ग शहरात रविवारी म्हशी पळविण्याची स्पर्धा मोठया उत्साहात पार पडली.
 शिवसेनेच्या (उबाठा ) वतीने या स्पर्धेसह किल्ला बांधण्यांचीही स्पर्धा घेण्यात आली. म्हशी पळवण्याच्या स्पर्धेत प्रथम पारितोषिक विकास भोसले व विजय सरोदे यांनी मिळविले.

 या स्पर्धेत नळदुर्ग येथील गवळी बांधव व सोलापूर, तुळजापूर, केशेगांव, अणदूर,,मूर्टा, होर्टी, जकनीतांडा, चव्हाणवाडी येथील गवळी बांधवानी आपल्या म्हशी या स्पर्धेसाठी आणले होते. व तसेच लहान मुलांसाठी दीपावलीचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी  किल्ले बांधणी स्पर्धा आयोजित करण्यात होती. यामध्ये लहान मुलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. यामध्ये मुलांनी पन्हाळगड रायगड, सिंहगड ,मल्हारगड, तोरणा या किल्यांची प्रतिकृती साकारण्यात आल्या होत्या.
म्हशी पळवण्याच्या स्पर्धेत  प्रथम बक्षीस विकास भोसले नळदुर्ग व विजय सरोदे सोलापूर यांना विभागून तर दुसरे बक्षीस सुनील जाधव यांनी पटकविले. तर तिसरे बक्षीस सोमा पवार यांनी पटकावले.तर एक म्हैस पळविणे स्पर्धेत लाला शेख यांना तर मोटारसायकल वरती म्हशी पळवणे मध्ये प्रथम बक्षीस जफर टेलर, दुसरे बक्षीस लक्ष्मण सापळे सोलापूर, तिसरे बक्षीस नेताजी अवचार व  मुर्टा येथील करदुरे यांनी पटकावले. 

  किल्ला बांधणी स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक राजमुद्रा ग्रुप भोई गल्ली, दुसरे बक्षीस अष्टविनायक ग्रुप बसवेश्वर चौक, तिसरे बक्षीस जगदंब ग्रुप भवानीनगर  व उत्तेजनार्थ बक्षीस शिवशाही ग्रुप मराठा गल्ली यांनी पटकावले आहे. या स्पर्धेसाठी स्वातंत्र्य सैनिक  कै. निल्लाप्पा महादेवप्पा कोरे यांच्या स्मरणार्थ सोसायटीचे माजी चेअरमन दत्तात्रय कोरे  व कै. सचिन उर्फ प्रीतम कमलाकर चव्हाण यांच्या स्मरणार्थ कमलाकर चव्हाण यांच्या वतीने  व नितीन उर्फ चिंटू राजकुमार धरणे यांच्या स्मरणार्थ बसवराज आप्पा धरणे यांच्या वतीने आणि ॲड. अरविंद बेडगे , तसेच समाधान कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ धनंजय कुलकर्णी यांच्या वतीने ५० तोळे पितळी साखळी, वत्सला गॅस संचालक प्रा.पांडुरंग पोळे ,रंगनाथ डुकरे यांच्या स्मरणार्थ रोहित डुकरे  यांच्या वतीने कै. राजेश कुलकर्णी यांच्या समरणार्थ आकाश कुलकर्णी यांनी तर गवळी बांधवांसाठी मानाचा गवळी गमजा डॉ. जितेंद्र पाटील, संजय जाधव यांच्या वतीने देण्यात आले.

ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शिवसेनेचे माजी नगरसेवक  कमलाकर  चव्हाण, उपतालुका प्रमुख सरदारसिंग ठाकूर, शहर प्रमुख संतोष पुदाले,  श्याम कनकधर, सोमनाथ म्हेत्रे युवा सेना शहर प्रमुख  नेताजी महाबोले , शंकर चव्हाण,  चंदर सगरे, ओंकार कलशेट्टी, रणजीत डुकरे, प्रवीण चव्हाण, नवल जाधव, अमित शेंडगे, श्रीकांत डुकरे, बिट्टू मुळे, प्रशांत चव्हाण आदीसह कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतले.
 
Top