श्री तुळजाभवानीच्या दरबारात दुसऱ्यांदा कमळ फुलल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकडून राणाजगजितसिंह पाटील यांचा भगवीशाल घालून गौरव
तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी भाजप नेते उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. धाराशिव जिल्ह्यातून सर्वाधिक मताधिक्य घेऊन विजय झाल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा गौरव केला.
विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या भव्य आणि ऐतिहासिक विजयानंतर उपमुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबई येथील सागर निवासस्थानी तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी रविवारी सदिच्छा भेट घेतली.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत आई श्री तुळजाभवानीच्या तुळजापूर येथून मोठ्या मताधिक्याने विजय मिळविल्याबद्दल ना. देवेंद्र फडणवीस यांनी भगवी शाल घालुन व बुके देवुन आभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. यावेळी ना. गिरीश महाजन , युवा नेते सुनिल चव्हाण, मल्हार पाटील, नितीन काळे, सतीश दंडनाईक आदी उपस्थित होते.