अवैधरित्या गुटखा व पान मसाला वाहतुक करणाऱ्या तिघांना १४ लाखाच्या मुद्देमाल जप्त ; नळदुर्ग परिसरात स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.”
नळदुर्ग,दि.१६:
नळदुर्ग पोलिस ठाण्याच्या हाद्दीत सलगरा त्या. तुळजापूर याठिकाणी बेकायदेशीर गुटखा व पान मसाला वाहतुक करणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रंगेहाथ पकडले.या कारवाईत इनोव्हा कारसह पान मसाला, तंबाखु जर्दा, सुगंधीत, सुपारी पदार्थ तत्सम गुटखा असा एकुण- 13 लाख 74 हजार 420 रुपये किंमतीचा माल पोलिसांनी जप्त केला.
मा. पोलीस अधीक्षक श्री.संजय जाधव, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. गौहर हसन यांचे मार्गदर्शनखाली व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. वासुदेव मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. कासार, पोलीस हावलदार शौकत पठाण,जावेद काझी, प्रकाश औताडे, फरहान पठाण चालक पोलीस अंमलदार तानाजी शिंदे असे विधानसभा निवडणुक 2024 अनुषंगाने धाराशिव जिल्ह्यातील अवैध धंदे करणाऱ्या इसमांवर कारवाई करणे कामी पेट्रोलिंग करत असताना जळकोट येथे आले.
या पथकास गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, इनोव्हा कार क्र एमएच 15 बी. एच 8888 मध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत केलेला गोवा गुटखा विक्री करण्यासाठी वाहतुक करत आहे. सदर कार ही जळकोट ते किलज रोडवरुन जात आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यावरुन पथकाने नमुद ठिकाणी जावून दि. 15.11.2024 रोजी 12.40 वाजता नमुद कारचा पाटलाग करत सलगरा दि. येथे आले असता. सदर ठिकाणी काही इसम कार मधून पान मसाला, तंबाखु जर्दा, सुगंधीत, सुपारी पदार्थ तत्सम गुटखा घरात टाकत असताना मिळून आला त्यावर पथकाने त्यास ताब्यात घेवून त्यांची नावे विचारले असता त्यांनी त्यांची नावे- शिवराज विश्वनाथ बोकडे, वय 39 वर्षे, रा.बेळंब ता. उमरगा जि. धाराशिव, दादासाहेब बब्रुवान शिगंटे, रा. सलगरा दि. ता. तुळजापूर जि. धाराशिव असे सागिंतले. त्यावर पथकाने सदर ठिकाणाहून वाहन इनोव्हा कार क्र एमएच 15 बी. एच 8888 सह पान मसाला, तंबाखु जर्दा, सुगंधीत, सुपारी पदार्थ तत्सम गुटखा असा एकुण- 13,74,420₹ किंमतीचा माल मिळून आलेने जप्त करुन मिळून आलेला माल व आरोपी नामे- शिवराज विश्वनाथ बोकडे, वय 39 वर्षे, रा.बेळंब ता. उमरगा जि. धाराशिव, दादासाहेब बब्रुवान शिगटे, रा. सलगरा दि. ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना ताब्यात घेवून आरोपी यांचे विरुध्द पोलीस ठाणे नळदुर्ग येथे गुरनं 446/2024 भा.न्या. सं. कलम 223,274,275, 123 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उप निरीक्षक गिते हे करत आहे.
सदर कामगिरी ही मा. पोलीस अधीक्षक श्री. संजय जाधव,अपर पोलीस अधीक्षक श्री. गौहर हसन यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. वासुदेव मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. कासार, पोलीस हावलदार शौकत पठाण,जावेद काझी, प्रकाश औताडे, फरहान पठाण चालक पोलीस अंमलदार तानाजी शिंदे यांचे पथकाने केली आहे.