नळदुर्ग:  श्री शिवलिंगेश्वर मठात महास्वामीजींच्या प्रमुख उपस्थितीत विविध कार्यक्रम ; माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, सिध्दाराम म्हेत्रे , बसवराज पाटील व धर्मराज काडादी यांची राहणार उपस्थिती


नळदुर्ग ,दि.१६ : नवल नाईक 

 नळदुर्ग येथे राजगुरू श्री शिवलिंगेश्वर शिवाचार्य मठात आज शनिवार दि.१६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता  महास्वामीजीच्या प्रमुख उपस्थितीत धर्माभिमानी मातोश्री गुरुमाता  शांताबाई मडीवाळय्या हिरेमठ यांच्या ७५ व्या वर्षानिमित्त  "अमृतमहोत्सवी तुलाभार"  व ७५ वर्ष पुर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा गौरव , त्याचबरोबर आध्यात्मिक प्रवचनाचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती  मठाचे मठाधीपती श्री ष. ब्र. बसवराज शिवाचार्य महास्वामीजी यांनी दिली आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, माजी मंत्री बसवराज पाटील, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, सोलापूर सिद्धेश्वर साखर कारखान्याचे चेअरमन धर्मराज काडादी, संचालक गुरुराज माळगे, माजी संचालक कल्याणराव पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयकुमार बदोले, पुण्याचे भीमाशंकर टोंगळे, अफझलपुरचे शिवप्रकाश सोबानी, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 

  यावेळी मादन हिप्परगा मठाचे श्री अभिनव शिवलिंग महास्वामीजी, हिरेमठ नागणसूरचे श्री श्रीकांठ शिवाचार्य महास्वामी, मैंदर्गीचे श्री नीलकंठ शिवाचार्य महास्वामी, ममदापूरचे श्री मुरुघेंद्र महास्वामी, सिंदगावचे बालयोगी श्री महेश्वरानंद महाराज, तोळनूर स्वामी मठाचे श्री पूज्य चन्नमल महास्वामी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

मठाधीपती श्री ष. ब्र. बसवराज शिवाचार्य महास्वामीजींचा ज्यांच्या उदारी जन्म झाला त्या मातोश्री गुरुमाता धर्माभिमानी शांताबाई मडीवाळय्या हिरेमठ यांच्या ७५ व्या वर्षाचे औचित्य साधुन त्यांचा अमृतमहोत्सवी तुलाभार करण्यात येणार आहे. तसेच
नळदुर्ग येथील विविध धार्मिक कार्यक्रमात विशेषतः मठातील कार्यक्रमात भजनासह तन, मन व धनाने सहभागी होऊन अविरतपणे गेली ७५ वर्षे सेवा करणाऱ्या माता --भगिनींचा अक्कनबळग या महिला मंडळाच्या अमृत महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त ७५ वर्ष वय पुर्ण केलेल्या जेष्ठ नागरीकांचा गौरव करण्यात येणार आहे.तसेच मानद हिप्परगा येथिल प्रतिष्ठित नागरिकांचा सत्कार करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास भाविक व नागरीकांनी  उपस्थित राहुन  कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन मठाधीपती श्री. ष. ब्र. बसवराज शिवाचार्य महास्वामीजी यांनी केले आहे.
 
Top