राष्ट्रवादीचे नेते अशोक जगदाळे प्रचारात सक्रिय! महाविकास आघाडीचे उमेदवार ॲड धिरज पाटील यांना बळ
तुळजापूर,दि.१५: शिवाजी नाईक
तुळजापूर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी कडून लढा देणारे धीरज पाटील यांना अशोक जगदाळे यांचे पाठबळ मिळाल्यामुळे तुळजापूर तालुक्यात धीरज पाटील यांना चांगले मताधिक्य मिळण्याची शक्यता निर्माण आहे.
मागील काही दिवसांपासून जगदाळे यांनी प्रचारातून अंग काढून घेतल्याची चर्चा होती. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील हे बॅक फुटवर गेले होते. मात्र शुक्रवारी (दि.१५) रोजी अशोक जगदाळे यांनी ॲड. धिरज पाटील यांच्यासह नळदुर्ग शहरात प्रचार फेरी काढत महायुतीला बॅकफूटवर ढकलले. तर धीरज पाटील यांना यामुळे बळ मिळाले असून काहीशी बॅक फुटवर गेलेली महाविकास आघाडी पुन्हा नव्या जोमाने लढा देण्यास तयार झाल्याचे चित्र निर्माण झाल्यामुळे महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना नव्याने एनर्जी मिळाली आहे.
जगदाळे यांनी २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत निर्णायक मतदान घेतले होते. तर २०२४ च्या लोकसभा निवडणुकवेळी प्रचारात हिरीरीने सहभाग घेत तुळजापूर मतदारसंघातून विद्यमान ओमराजे निंबाळकर यांना ५० हजाराचे मताधिक्य घेण्यात मोलाची भुमिका बजावली होती. जगदाळे यांनी आखेर ॲड. धिरज पाटील यांच्यासाठी पुढाकार घेतल्याने महायुतीच्या गोटात टेंशन वाढण्याची शक्यता मतदारातुन वर्तवली जात आहे.