आम्मा वाचनालयास युनिटी मल्टीकॉन्स कंपनीकडून 101 पुस्तके भेट
नळदुर्ग,दि.२३:
नळदुर्गचे माजी नगरसेवक व ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष विनायक अहंकारी यांनी वाचन संस्कृती जिवंत राहावी यासाठी सुरु केलेल्या आम्मा वाचन कट्टास व आम्मा वाचनालयास अल्पावधीतच मोठा प्रतिसाद मिळत आहे.
सामाजिक क्षेत्रासह विविध क्षेत्रात अग्रेसर असलेल्या सोलापूर येथील युनिटी मल्टीकॉन्स कंपनीकडून आज आम्मा वाचनालयांस 101 पुस्तके भेट देण्यात आली.यावेळी युनिटीचे कार्यकारी संचालक कफिल मौलवी. युनिटीचे संचालक जयधवल करकमकर व संचालिक वैशालीताई जैन यांच्या हस्ते हे पुस्तक देण्यात आले.
गेल्या काही दिवसापासून आम्मा वाचनालयांस लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
महाराष्ट्र पोलीस प्राधिकरण समितीचे सदस्य उमाकांत मिटकर यांनी 51 पुस्तके भेट दिली. दगडू जाधव गुरुजी यांनी 51 श्यामची आई पुस्तके तर सुनिल उकंडे आणि कविताताई पुदाले यांनीही 51 पुस्तकं भेट दिली. आहेत.
मोबाईलच्या युगात मुलांनी वाचनापासून अंतर ठेवले आहे. त्यामुळे दर रविवारी एक तास वाचन क्लास ही संकल्पना सुरु केली आहे.विनायक अहंकारी यांच्या या नवीन प्रयत्नामुळे लहान मुले वाचनाकडे आकर्षित होत आहेत.