डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधानाबद्दल व परभणी प्रकरणाच्या निषेधार्थ नळदुर्ग शहर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
नळदुर्ग ,दि.२३:एस.के.गायकवाड
भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल देशाचे गृहमंत्री अमीत शहा यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाबद्दल आणि परभणी येथील भिमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या संबंधित पोलिस प्रशासनाच्या विरूद्ध भिमसैनिकांच्या वतीने सोमवारी नळदुर्ग शहर बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अवमान केला.अमित शहा यांच्या या आक्षेपार्ह विधानचा जाहीर निषेध व परभणी येथील शहीद भिमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू कारणीभूत असलेल्या पोलीस प्रशासनाच्या विरोधात नळदुर्ग येथे भिमसैनिकांच्या वतीने नळदुर्ग बंद करून मोर्चा काढण्यात आला. भिमनगर नळदुर्ग येथील बौद्ध विहार पासून मान्यवरांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून मोर्चास सुरूवात करण्यात आली.भिमनगर बौद्ध विहार ते कुरेशी गल्ली, किल्ला गेट, चावडी चौक मार्गे निदर्शने करित अमित शहा यांच्या निषेधार्थ प्रचंड घोषणाबाजी करीत हा मोर्चा बसस्थानका समोर संविधान चौकात आला..या ठिकाणी या मोर्चाचे सभेत रूपांतर झाले.या प्रसंगी अमित शहा यांनी देशाची माफी मागून गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा,शाहिद सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबाचे पन्नास लाख रुपये देऊन पुनर्वसन करावे, सुर्यवंशी यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना कायमस्वरूपी निलंबित करुन त्यांच्यावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा आदीसह विविध मागण्यांचे निवेदन नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांना देण्यात आले.
यावेळी सुनील बनसोडे, बाबासाहेब बनसोडे, दुर्वास बनसोडे,एस.के.गायकवाड, किशोर नळदुर्गकर, कैलास गवळी गुरुजी, अरूण लोखंडे, योगेश बनसोडे, सचिन बनसोडे, सिध्दांत बनसोडे, अजयकुमार बागडे,रूषीकेश कांबळे,अश्वजीत कांबळे ,मारुती बनसोडे,शामकांत नागीले, दत्ता बनसोडे, महादेव कांबळे, राजेंद्र शिंदे,सरेश लोंढे, विश्वास रणे, तानाजी कदम, वामन धाडवे, रवी वाघमारे, अनिल वाघमारे,महिला कार्यकर्त्यां उषा शिंदे, पिंकी भोसले,संगीता वाघमारे, कल्पना गायकवाड,स्नेहा झेंडारे,सह नळदुर्ग व परिसरातील भिमसैनिक उपस्थित होते.