नळदुर्ग: सोलर प्रकल्प रद्द करून दुसरीकडे स्थलांरित करण्याची व्यापा-यासह प्रतिष्ठित नागरिकांची जिल्हाधिकारीसह आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडे

नळदुर्ग,दि.२४:


नळदुर्ग शहरातील  तुळजापूर रस्त्यालगत
 महत्वाच्या ठिकाणी होत असलेल्या  सोलर प्रकल्प रद्द करून दुसरीकडे स्थलांरित करण्याची नळदुर्ग शहरातील व्यापा-यासह भाजपचे पदाधिकारी व प्रतिष्ठित नागरिकांनी धाराशिव जिल्हाधिकारी व तुळजापूर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.


नळदुर्ग येथील तुळजापूर जाणाऱ्या रोड लगत असलेल्या सर्वे नं.236/7 मधील 11 हेक्ट्र 26 आर जागेवर शासनाच्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजने अंतर्गत नवीन सौर प्रकल्प मंजुर झालेला आहे.

मात्र ज्या जागेवर प्रकल्प होत आहे, ती जागा नळदुर्ग शहराच्या भौगोलिक स्थितीमध्ये अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे भविष्यात नळदुर्ग तालुक्याची निर्मिती झाल्यास निर्माण होणाऱ्या विविध शासकीय कार्यालयासाठी नवीन इमारतीसाठी अत्यंत महत्वपुर्ण जागा आहे.
तरी  हा मंजुर झालेला सौर प्रकल्प्  इतर ठिकाणी करून ही जागा नळदुर्गच्या विकासासाठी राखीव ठेवण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.


निवेदनावर भाजपचे नेते सुशांत भुमकर, पत्रकार विलास येडगे, शहरध्यक्ष धिमाजी घुगे, माजी नगरसेवीका छमाबाई राठोड, माजी नगरसेवक विनायक अहंकारी, माजी नगरसेवक सुधीर हजारे, व्यापारी मंडळाचे अध्यक्ष सतिश पुदाले, माजी उपनगरध्यक्ष संजय मोरे, अंबाबाई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रमेश जाधव, माजी शहध्यक्ष पद्माकर घोडके, रणजितसिंह ठाकुर, व्यापार गौस शेख, , सुभाष कोरे, समिर मोरे, अनिल पाटील, पांडुरंग पुदाले, एस.के.बागवान, सुजित सुरवसे, अजित पंडीत, विनायक पुदाले, , संतोष मुळे  आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत.
 
Top