माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांची आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी घेतली भेट
नळदुर्ग,दि.२४:
भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी
जेष्ठ नेते, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांची अणदूर ता.तुळजापूर येथिल निवासस्थानी भेट घेऊन त्यांच्या तब्यतेची आस्तेवाईक पणे विचारपूस केली.
आमदार पाटील म्हणाले की,भेटी दरम्यान माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी श्री तुळजाभवानी मंदिर आणि एकंदरीत तुळजापूर तालुक्यात सुरु असलेल्या विकासकामांची माहिती मधुकरराव चव्हाण यांना दिली असून ते नेहमीच तुळजापूरच्या विकासाबाबत आग्रही राहिले आहेत. त्यांचाच विकासाचा वारसा आपण पुढे नेत असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.
यावेळी सुनील चव्हाण, बाबुराव चव्हाण, दीपक आलुरे, साहेबराव घुगे यांच्यासह अणदूर व परिसरातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.