विनायक अहंकारी यांनी सुरु केला आईच्या नावाने वाचन कट्टा: स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक
नळदुर्ग,दि.०१ :
आजच्या मोबाईल युगात वाचन संस्कृती कमी होत चालली आहे. वाचनाने ज्ञानात भर पडते. सर्वाना वाचनाची गोडी लागावी म्हणून माजी नगरसेवक विनायक अहंकारी यांनी आईच्या नावाने सुरु केले वाचन कट्टा,त्याचा शुभारंभ रविवारी करण्यात आले.
नळदुर्ग येथील माजी नगरसेवक व ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष विनायक अहंकारी यांनी अतिशय स्तुत्य उपक्रम सुरु केले आहे. आपल्या मातोश्री कै.यमुनाबाई ( आम्मा ) अहंकारी यांच्या स्मरणार्थ आम्मा वाचन कट्टा सुरु केले आहे.यामध्ये सर्व वर्तमानपत्रे व विविध पुस्तके वाचण्यासाठी ठेवण्यात येणार आहे.
यावेळी माजी नगरसेवक कमलाकर चव्हाण, माजी नगरसेवक शरद बागल, माजी नगरसेवक बसवराज धरणे, पत्रकार विलास येडगे,पत्रकार शिवाजी नाईक, पत्रकार उत्तम बनसगोळे,पत्रकार भगवंत सुरवसे, आंबाबाई मंदिर समितीचे अध्यक्ष रमेश जाधव, जेष्ठ नागरिक उत्तम रामदासी, वसंत रामदासी, सुधीर पुराणिक, नंदकुमार जोशी, सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव, राजकुमार वैद्य, आकाश कुलकर्णी, संदीप वैद्य, प्रमोद कुलकर्णी, उमेश नाईक, सचिन भूमकर , संतोष नाईक, उमेश जाधव, सतीश जाधव, प्रदीप ग्रामोपाध्याय, प्रशांत जोशी, सन्नी भूमकर, ज्ञानेश्वर केसकर, अजय देशपांडे, बंडाप्पा कसेकर, पप्पू पाटील, बलदेवसिंह ठाकूर, हालीम पटेल, चंदू काका भूमकर, मुकुंद भूमकर, शाम वऱ्हाडे, अनिल कुलकर्णी, तानाजी नागणे, अरुण जोशी, सुदर्शन पुराणीक, स्मितेश जोशी, अजय मोरे आदीसह नागरिक उपस्थित होते.