देशसेवेसाठी तरुणांनी तत्पर रहावे - डॉ संजय अस्वले
मुरुम दि.१६
श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील उमरगा येथील कॅडेट रावण ममाळे (सीआयएसएफ ) माजी विद्यार्थी संदिप कुंभार (आयटीबीपी ), नवनाथ पाश्मे ( सीआरपीएफ) यांचे स्पर्धा परीक्षा पोलीस , सैन्यदल ॲकडमी , करिअर कट्टा, NCC विभागा तर्फे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय अस्वले यांनी त्यांचा गौरव केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षिय भाषणात कॅडेटसना ,विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना सरांनी आपल्या भाषणात सांगितले की, केवळ सैन्यदल , पोलीस , निमलष्करी पदावर भरती झाल्या नंतर न थांबता एमपीएससी , युपीएससी या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातुन वर्ग एक (क्लासवन ) , वर्ग दोन (क्लासटु 'ची तयारी करावी असे सांगितले. यासाठी महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र , करिअर कट्टा , सैन्य -पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण जे की लेखी परीक्षेची तयारी करूण घेते व एनसीसी च्या माध्यमातून मैदानाची तयारी करूण घेते . यासाठी विद्यार्थ्यानी याचा लाभ घेऊन देशाची सेवा करावी असे आवाहन केले . या कार्यक्रमासाठी उप्राचार्य डॉ विलास इंगळे , डॉ पदमाकर पिटले , कॅप्टन ज्ञानेश्वर चिट्टमपल्ले, उपस्थित होते . सूत्रसंचलन डॉ चंद्रसेन करे आणि आभार डॉ समाधान पसरकले यांनी केले . या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक , कॅडेटस , विद्यार्थी , कर्मचारी बहुसंखेने उपस्थित होते .